Mumbai CJP Protest : मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाले, हा व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

Mumbai CJP Protest : 18 जुलैपासून जमावबंदी लागू केली आहे. आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी 13 गुन्हे नोंदवले आहेत. यात 400 लोकांची नावं आहेत. या आंदोलनादरम्यान एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Mumbai CJP Protest : मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाले, हा व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल
Police Van
| Updated on: Jul 23, 2026 | 3:02 PM

दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 18 जुलैपासून जमावबंदी लागू केली आहे. आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी 13 गुन्हे नोंदवले आहेत. यात 400 लोकांची नावं आहेत. या आंदोलनादरम्यान एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांना वॅनमध्ये भरुन घेऊन जात होते. या दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या आंदोलकांनी वॅनचा दरवाजा उघडला व सर्व आंदोलक एक-एक करुन खाली उतरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. विद्यार्थ्यांचा एक गट या कृतीच कौतुक करतोय, समर्थन करतोय. दुसरागट याला अराजकता ठरवत आहे.

दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर देशाच्या वेगवेगळ्या भागात जोरदार विरोध प्रदर्शन सुरु आहे. त्यासाठीच मुंबईत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस वॅनमध्ये बसवून घेऊन जात होते. सगळी व्हॅन आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली होती.

टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत

या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या एका युवकाने व्हॅनचा दरवाजा उघडला. त्यानंतर लगेच ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलक व्हॅनमधून खाली उतरले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. काही लोक याचा व्हिडिओ बनवत होते.

विनापरवानगी आंदोलनं

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. शिवाजी पार्क, चैत्यभूमी, चेंबूर, शिवसेना भवन सह वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवानगी आंदोलनं करण्यात आली.

प्राथमिक तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया

सोमवारी दादर चैत्यभूमी परिसरात विनापरवानगी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. प्राथमिक तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. बेकायद पद्धतीने एकत्र जमणे अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us