Mumbai Police Kucu-Pucu : मुंबई पोलीस कुचु-पुचु… अभिजीत दीपकेंकडून कौतुक; कुचु-पुचुचा अर्थ काय?

अभिजीत दीपके यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक करत त्यांना 'कुचु-पुचु' संबोधले. दादरच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या सहृदयतेमुळे दीपके प्रभावित झाले. 'कुचु-पुचु' या जेन-झेड शब्दाचा अर्थ अत्यंत प्रिय व्यक्ती असा होतो. दीपके यांनी पोलिसांच्या कार्याला सलाम करत त्यांना जगातील सर्वोत्तम म्हटले.

Mumbai Police Kucu-Pucu : मुंबई पोलीस कुचु-पुचु... अभिजीत दीपकेंकडून कौतुक; कुचु-पुचुचा अर्थ काय?
Abhijit Deepke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 5:57 PM

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यालाही सलाम केला आहे. मुंबई पोलीस क्यूट आहेत. त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. मुंबई पोलीस जगात बेस्ट आहे, अशा शब्दात अभिजीत दीपके यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. मुंबई पोलीस म्हणजे कुचु-पुचु (Mumbai Police Kucu-Pucu) आहेत, असंही ते जेनजीच्या भाषेत म्हणाले. दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित जेलभरो आंदोलनातून अभिजीत दीपके बोलत होते.

अभिजीत दीपके यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील पोलीस सर्वात बेस्ट आहेत. मुंबई पोलीसही बेस्ट आहे. उगाच मुंबई पोलिसांना जगात बेस्ट म्हटलं जात नाही. मुंबई पोलीस क्यूट आहेत. कुचूपुचू आहेत. अभिजीतला उचला म्हणून मुंबई पोलिसांना वरून ऑर्डर आली होती. पण मुंबई पोलीस एवढे क्यूट आहे की, त्यांनी मला चहा पाजली आणि म्हणाले, सर तुम्ही जा. तुम्ही जे करत आहात. ते खूप चांगलं करत आहे. त्यामुळे माझा मुंबई पोलिसांना सलाम आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले.

Loading...

संघी आहात तर खाकी चड्डी घाला

यावेळी त्यांनी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांच्यावर जोरदार टीका केली. सचिन शर्मा दलिंदर आहेत. जनरल डायर आहे. तो अमित शाहांचा जनरल डायर आहे. त्यांनी आजही आमच्या सहकाऱ्यांना उचललं. आज दिल्लीत बॅरिकेड लावले. थोडं थांबा. देशातून इतके लोक येतील, तुमचे बॅरिकेड कमी पडतील इतकं मोठं आंदोलन होईल. सचिन शर्मा स्वत: अमित शाहांच्या पाया पडेल आणि बदली करून घेईल. सचिन शर्मा संघी आहे. तुम्ही संघी आहात तर खाकी चड्डी घाला. वर्दी घालू नका. शाखेत जा. वर्दी घालू नका, असा हल्लाच त्यांनी चढवला.

मुंबई पोलीस वुई लव यू…

यावेळी आंदोलकांनी मुंबई पोलिसांचा जयघोष केला. मुंबई पोलीस वुई लव यू… वुई लव यू… मुंबई पोलीस वुई लव यू… वुई लव यू… च्या घोषणा दिल्या. मुंबईकर वुई लव यू… शिवाजी पार्कचे रहिवाशी वुई लव यू… मराठी मीडिया वुई लव यू… अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

कुचु-पुचु म्हणजे काय?

कुचु-पुचु हा जेनजीच्या भाषेतील सांकेतिक शब्द आहे. याचा अर्थ अत्यंत प्रिय व्यक्ती. लहान मुलांना जसं आपण लाडाने कुची कुची म्हणतो. तसंच एखाद्या व्यक्तीला प्रेमाने कुचु-पुचु म्हटलं जातं. जेनजीच्या भाषेत हा प्रेमळ आणि आदराने बोलला जाणारा शब्द आहे. कधी कधी टोला लगावण्यासाठीही हा शब्द वापरला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us