
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई रेड अलर्ट तर कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासून मुंबईत जोरदार वारे वाहत असून भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई, महाराष्ट्रासह पावसाचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर पाहा….
सातारा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना प्रचंड पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरेगाव तालुक्यातील जिहे आणि कटापूर गावांना जोडणारा कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून दोन्ही बाजूंना पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावले आहेत.
खेड तालुक्यातील गोलेगाव-पिंपळगाव येथे इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तसेच स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट पाण्याखाली गेले आहेत. नदीच्या वाढलेल्या पाणलोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. तळा तालुक्यातील कडाक्याची गाणी हे गाव मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असून, गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना नदी ओलांडून प्रवास करावा लागतो. गाव हे डोंगर कुशीत असल्याकारण असतं गावावर दरड कोसळण्याचा संभाव्य धोका असतो. त्याचप्रमाणे गावात जाण्याकरता नदी ओलांडावे लागते मात्र मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र वाढले होते त्यामुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. गोदाकाठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून खडकवासला धरणातून 1 लाख क्युसेक्सने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. तसेच प्रशासनाकडून दौंड शहर आणि भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती
औंध ते शिवाजीनगर उड्डाणपुलाचे लोकार्पण
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवारांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग
तर अजित पवारांच्या बाजूला बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पुलावरून प्रवास
नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे
त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे
जळगावमधील एरंडोल तालुक्यात खेडी गावाजवळ शेतात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोदावरी नदीकाठ परिसरात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून गोदाकाट परिसरातील नागरिकांना अलर्ट करण्यात येत आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील मंदिर पाण्याखाली गेलं आहे. तसेच पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी गेलं आहे.
बीडमधील गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथे राहत्या घराची भिंत कोसळुन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये नजीर कटु पठाण वय ७० वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर घरातील संसारपयोगी वस्तुंचे देखील नुकसान झाले आहे.
विरार पश्चिम स्टेशन ते बोलिंज रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. सकाळी दहा नंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र त्यानंतरही सध्याकाळी 5 पर्यंत 3-4 ते चार फूट पाणी साचलेलं आहे. त्यामुळे विरार स्टेशन ते बोलिंज आणि आगाशीसा जाणाऱ्या नागरिकांची ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू आहे.
ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल, 2025 लोकसभेत सादर करण्यात आले आहे. हे विधेयक ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेम्सना प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्याशी संबंधित हानिकारक ऑनलाइन मनी गेमिंग सेवा, जाहिराती आणि आर्थिक व्यवहारांवर बंदी घालते. हे विधेयक ऑनलाइन फॅन्टसी स्पोर्ट्सपासून ते ऑनलाइन जुगार आणि ऑनलाइन लॉटरीपर्यंत सर्व ऑनलाइन बेटिंग आणि जुगार क्रियाकलापांना बेकायदेशीर ठरवते.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी राजेशला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी राजेशला सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे.
विरारमध्ये काल झालेल्या पूरपरिस्थितीत शिवसेना उबाटा गटाचे विरार शहरप्रमुख उदय जाधव यांनी गरोदर महिलेला मदतीचा हात दिला. आपल्या कार मधून रुग्णालयात दाखल केले आहे. प्रसुती पूर्वीच्या वेदनाने गरोदर महिला व्याकूळ झाली होती. सर्व परिसरात पूर परिस्थिती असताना तिला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. पल्लवी चिल्ले असे गरोदर महिलेचं नाव असून तिला रुग्णालयात दाखल करताच मुलगा झाला आहे. बाळ आणि आई दोघेपण सुखरुप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसईतून महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचा जोर ओसरला तरी अद्याप पाणी साचल्याचं चित्र आहे. अंबाडी ब्रिजजवळ पूर्वेला मुख्य रस्त्यावर कालपासून पाणी साचले आहे. या पाण्यातून मार्ग करताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने वसई वाहतूक पोलीस ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहनं बंद पडली तर त्यांना बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन ठेवल्या आहेत.
वसईत साचलेल्या पाण्यात पडून एका 70 वर्षे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. लिलाबाई रोहम असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या विशाल नगर परिसरात भगवती अपार्टमेंटमध्ये ही महिला राहत होती.
रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. तळा तालुक्यातील कड्यांची गाणी आदिवासी वाडी गावाचा संपर्क तुटला आहे. कड्यांची गाणी गावाचा संपर्क तुटल्याने 12 कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर करणे सुरू केले आहे.
जळगावच्या एरंडोल तालुक्यात खेडी गावाजवळ शेतातून जात असताना विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जोरदार मान्सूनवाऱ्यामुळे उत्तर आणि दक्षिण गुजरातमध्ये वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे.उत्तर आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर नैऋत्येकडून पश्चिमेकडे ५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मोनोरेलमध्ये काल बिघाड झाल्यानंतर एक रेक कमी झाल्याने मोनोरेलच्या फेऱ्या अर्ध्या तासांच्या अंतराने होत आहेत.
ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचं शिंदेंनी स्वागत केलं आहे.
बेस्ट पतपेढी निवडणुकीचा (BEST Election 2025) निकाल अखेर समोर आला आहे. 18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला.शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. याबाबत शशांक राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की; “ठाकरेंकडून स्वत:च्या फायद्यासाठी बेस्टचं नुकसान झालं. आम्ही कामगारांसाठी जे काम केलं त्याची पोचपावती मिळाली” असंही ते म्हणाले.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खेडी येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडी गावानजीक एका शेतात सर्व पाचही जणांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयतामध्ये ४० वर्षीय दोन महिला , ४५ वर्षीय एक पुरुष.. आणि सहा मुलगी आणि आणि आठ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहेया घटनेमध्ये दैवबलवत्तर म्हणून सुदैवाने तीन वर्षाची मुलगी बचावली आहे. शेतात जाताना विजेचा धक्का लागून सर्वांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा (BEST Election 2025) निकाल अखेर समोर आला आहे. 18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला.शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला
“कामगारांसाठी काम केलं, आज पोचपावती मिळाली. ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. कामागारांच हित न पाहिल्यास भोपळाच मिळणार. बेस्टमध्ये ठाकरेंनी खासगीकरणाच धोरण राबवलं” अशी टीका शशांक राव यांनी केली. त्यांच्या पॅनलचा बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत विजय झाला.
नवीन मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा. रोहित पवार आणि शशिंकात शिंदे मोर्चात सहभागी. रोहित पवारांचा संजय शिरसाट यांच्यावर 5 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप.
ठाकरे ब्रांडला शुन्य जागा मिळाल्या. राज ठाकरेंना सोबत घेऊनही उद्धव ठाकरेंना फायदा नाही. जनतेचा शशांक राव, प्रसाद लाड यांना आशिर्वाद असं आमदार प्रसाद लाड म्हणाले.
जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा जवळपास 2 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 39 पशुधन दगावले आहेत. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली आहे. बदनापूर तालुक्यातील 9 गावातील 378 शेतकऱ्यांचे 470 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून परतुर तालुक्यातील 7 गावातील 1 हजार 612 शेतकऱ्यांचे जवळपास दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याच प्राथमिक अहवालात समोर आल आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली. घाट माथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल. स्वतः हाताने दरडी बाजूला करत केली वाहतूक सुरळीत. घटनेत कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाहीय
भांडुपममध्ये महावितरणच्या वायरचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कानात हेडफोन घालून प्रवास करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. नागरिकांनी त्याला बाजूला होण्यासाठी हाक दिली होती. दीपकच्या कानातील हेडफोनमुळे त्याला हाक ऐकू आली नाही. दीपक पिल्ले असं त्या तरुणाचं नाव होतं. भांडुपच्या पन्नालाल कम्पाऊंडमध्ये त्याचा मृत्यू झाला.
कल्याणनगर मार्गावरील रायते नदी परिसरात अडकलेल्या नॅशनल हायवेच्या 30 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रस्त्याचं काम सुरू असताना आज अचानक पाणी वाढल्याने कामगार अडकले होते. स्थानिक प्रशासन तहसीलदार NDRF टीमने त्यांना सुखरुप बाहेर काढलं.
शहाड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने टिटवाळा रस्ता संपूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी आहे.
कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांसह तबेल्यामध्ये खाडीचं पाणी शिरलं आहे. तबेला मालकांनी गोविंदवाडी बायपास पुलावर म्हशी बांधल्या आहेत.
जळगाव बाजार समितीमध्ये रिक्त असलेल्या सभापती, उपसभापतीपदासाठी 29 ऑगस्ट रोजी निवड प्रकिया पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी सभापती, उपसभापती या पदाच्या निवडीबाबतचे आदेश काढले आहेत. उपसभापती तसेच सभापती या दोघांनी आपले राजीनामे दिल्याने दोन्ही पदे रिक्त आहेत.
मुसळधार पावसामुळे कल्याण-नगर मार्गावरील रायते नदीत अडकलेल्या नॅशनल हायवेच्या ३० बांधकाम कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रस्त्याचे काम सुरू असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कामगार अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन, तहसीलदार आणि एनडीआरएफ (NDRF) टीमने तातडीने बचावकार्य सुरू केले. पोकलेन (Excavator) मशीनचा वापर करून कामगारांना बाहेर काढण्यात आले. या बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
इगतपुरी नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे या वाड्या-वस्त्यांच्या रस्त्यावर पाणी साचलं आहे. इगतपुरी शहरात जोरदार पाऊस चालू असून प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-नालासोपारा जोडणारा मुख्य वसंत नगरी रस्ता जलमय झाला आहे. सध्या रस्त्यावर कंबरे इतके पाणी साचले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एका खासगी कंपनीची बस काल सकाळपासून पाण्यात बंद पडली असून, ती अजूनही रस्त्यावर उभी आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वसंत नगरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माळीण-भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे, डिंभे धरणातून घोड नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या १७,००० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नदी सध्या धोकादायक पातळीवरून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक अप आणि डाऊन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये मुंबई ते मडगाव धावणारी 12051 जनशताब्दी एक्सप्रेस, 12052 मडगाव ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, आणि 2220 वंदे भारत एक्सप्रेस या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चाकरमान्यांच्या गणेशोत्सवाच्या प्रवासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आज, बुधवारी, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात पाऊस नसला तरी, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील प्रमुख नद्या, प्राणहिता आणि गोदावरी, धोका पातळीच्या जवळ वाहत आहेत. पुराचे पाणी वाढल्याने अनेक लहान-मोठे मार्ग सायंकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पावसामुळे रेल्वे वाहतूकीला मोठा फटका बसला असून लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
बच्चू कडू यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची, संत्रा बागांची आणि घरांची पाहणी.
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलंय.
दोन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून, शहरातील मुख्य रस्त्यावर गुडगाभर पाणी साचले आहे. अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने सतर्कतेचा इशारा. गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढण्याचा धोका. गोदा घाटावर दर बुधवारी भरतो आठवडे बाजार
प्रशासनाकडून समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे टाळण्याचे आवाहन. मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळल्या. पाण्याची पातळी वाढल्याने परिसरात शुकशुकाट. नेहमी गर्दी असणाऱ्या मॉर्निंग वॉकसाठी नागरिक व पर्यटकांचा अभाव
ॉ
मोनो रेल्वे ओव्हरलोड झाल्याने बंद पडल्याची माहिती मोनो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मोनोची क्षमता ही 105 टन इतकी आहे. मात्र बंद झालेल्या मोनोत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. त्यांचं वजन 109 टनपर्यंत गेलं. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झआला. त्यामुळे मोनो बंद पडली. तसेच प्रवाशी सांगूनही मोनोत चढले, असं मोनो प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनवर वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या उशिरा असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मुंबई अग्नीशमक दलाकडून या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे. घटनास्थळी पालिकेचं वैद्यकीय पथक उपस्थित आहेत. मोनो रेल्वे संध्याकाळी सव्वा सहा दरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क स्थानकादरम्यान बंद पडली होती. तेव्हापासून हे प्रवाशी अडकून होते. मात्र त्यानंतर आता या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे.
पालघर जिल्ह्यात उद्या बुधवारी 20 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मोनोरेलच्या घटनेची चौकशी करणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. प्रवाशांनी संयम बाळागावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली होती. वांग यी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
मुंबईतील मोनोरेल बंद पडल्याने एकच खळबळ उडाली होती. 200हून अधिक प्रवाशी यात अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून एका एका प्रवाशाला बाहेर काढलं जात आहे.
मोनो रेल्वेत अनेक प्रवाशी अडकल्याची घटना घडली आहे. काचा फोडून बाहेर काढलं जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या एका तासापासून लोकं अडकले आहेत. त्यामुळे प्रवाशी हात जोडून बाहेर काढण्याची विनंती करत आहेत.
परभणीच्या सेलू वालूर रोडवरील राजवाडी येथे दुधना नदीवरील पुलावरून गुडघ्यावर पाण्यात दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली आहे. श्रीरंग जावळे, मारुती हारकळ असं बुडालेल्या व्यक्तींची नावे आहेत. एक व्यक्ती वालूर तर दुसरा गुळखंड येथील रहिवाशी असल्याची माहिती कळते. प्रशासनाकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.
मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नवीन विधेयकात ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची तरतूद आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात जोहरापूर – देवटाकळी या रोडवरील पूल दोन दिवसांपूर्वी वाहून गेला असून यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे मुग, सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आज शेतकऱ्यांनी थेट नदीत उतरून आंदोलन केले. सदर पूल हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून, पूल वाहून गेल्याला दोन दिवस उलटूनही संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळी फिरकले नसल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव मध्ये लेंडी नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, 60 पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत खांब आणि डिपी जागोजागी उखडून पडल्याने गावकऱ्यांना रात्र अंधारात जागून काढावी लागली आहे.
तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बोरी नदीला पूर आला आहे. बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावातील शेतकरी, विद्यार्थी,आणि वाहनधारकांचा वाहत्या पाण्यातूनच प्रवास सुरू आहे. या पुलाची उंची वाढवावी यासाठी गेले अनेक वर्ष गावकरी मागणी करत आहेत.
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर रेल्वे स्टेशनवर पाणी साचले आहे. दादर स्टेशन वरून कर्जतला जाणारी 10.50 ची लोकल ट्रेन अजूनही प्लेटफॉर्म वर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना स्पीकरच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहेत.
सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल रद्द
ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत
रेल्वे वाहतूक कोलमडल्यानं चाकरमान्यांना मोठा फटका
अमरावतीला पावसानं झोडपलं; नदी, नाल्यांना पूर
अमरावती जिल्ह्यातल्या शिरजगाव कसबा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस
मेघा नदीला मोठा पूर, शिरजगाव कसबा गावाच्या अनेक भागात पाणी शिरले
गावातील मुख्य पुलाच्यावरून वाहू लागले पुराचे पाणी
पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठं नुकसान
पुणेकरांची चिंता वाढली
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
जलसंपदा विभागाचा पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सायंकाळी सातपासून 35574 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार
वसई-विरार-पालघर-नालासोपारामध्ये तुफान पाऊस सुरु आहे. मिठागर परिसरात 100 जण अडकले आहेत. लोकांच्या घरात पाणी शीरलं आहे. भाईदा पाड्यात दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे.
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. सरकारवर टीका करण्यापेक्षी रस्त्यावर उतरून लोकांना मदत करण्याची वेळ असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरुच आहे. ठाण्यातील काजूपाडा भागात पाणी साचलं आहे. कंबरेएवढं पावसाचं पाणी अनेक भागात साचलं आहे. तसेच वाहनेदेखील पूर्णपणे पाण्यात आहेत. त्यामुळे वाहनांचंही नुकसान झालं आहे.
महाराष्ट्रात सर्वत्रच पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुखमेडमध्ये आभाळ फाटलं असून तेथील हसनाळ गाव उद्ध्वस्त झालं आहे.
वसई विरार नालासोपर्यत अक्षरशः आज जलक्रोप झाला आहे. महापालिका आयुक्त आणि वसईच्या आमदार स्नेह दुबे यांच्याकडून पूर्ण परिसराची पाहणी सुरू आहे. मागच्या २४ तासात २०० मिमी पाऊस झाला आहे. अनेक लोकांना पालिकेच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे संगम माहुली परिसरात पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पश्चिम भागात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.
कल्याण-शीळ मार्गावर कमरेइतके पाणी भरल्याने वाहतूक पोलिसांनी मार्ग एकतर्फी बंद केला आहे. जीव मुठीत घेऊन काही बसचालकांनी प्रवाशांना पाण्यातून नेल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे 14 लाख पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. राज्यातील 12 ते 14 लाख एकरवरील शेती बाधित झाली आहे. राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी करण्यात आली. मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.09 मीटर इतकी वाढली आहे.
लोणावळा- सालतर गावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे इमर्जन्सी लँडिक करण्यात आलं. लोणावळ्यापासून अवघ्या 30 किमी. अंतरावर हेलिकॉप्टर लँड करण्यात आलं.
पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारं पवना धरण 100 टक्के भरलंय. त्यामुळं शहरवासीयांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. याच पवना धरणातून आता पवना नदीत 4,300 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आलाय.
दहिसर पूर्व इथल्या सुमंगल अपार्टमेंट, सीएस रोड, आनंद नगर परिसरात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वेतील सुमंगल अपार्टमेंटजवळील रस्त्यावर पाणी साचलं आहे. इथंही पंपिंग मशीन वापरून पाणी काढण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे.
ठाण्याहून CSMT कडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द झाल्याची घोषणा पोलिसांकडून करण्यात येत आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दादर रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना मुंबई महापालिकेकडून बिस्किट वाटप करण्यात येत आहे. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने दादर रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकले आहेत.
कुर्ल्यातील LBS मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला आहे. वसई विरार मध्ये सकाळ पासून पावसाचा हाहाकार. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुपार नंतरही पावसाचा जोर कायम आहे
मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वेतील आनंद नगर मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचलं आहे. आनंद नगर मेट्रो स्टेशनखाली पाणी आहे, सर्व बाजूंनी पाणी दिसत आहे.
बीएमसी कर्मचारी पंपिंग मशीन वापरून पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्य मंत्रीमंडळ बैठकीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाचा आढाव घेणार आहेत. उपाययोजनांसंदर्भात बैठकीत मोठा निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुर्ल्यामधील नागरिकांना स्थलांतराचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय. कुर्ल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आह.
गेल्या 3-4 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं, पाणी साठ्यात वाढ होऊन धरणं 100 टक्के भरलं
कल्याण पूर्व-पश्चिम ‘नदीचे स्वरूप’; अडवली-ठोकली परिसरात पाण्याचा पूर, राघुबाई चौक-केतन पार्क जलमय. अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने नागरिक घरातच अडकले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद; नागरिक घरातच आहेत.
आज सकाळी स्वत: पालिका आयुक्त पोलिस आयुक्त एमएमआरडीए आयुक्त, रेल्वे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जीएमसोबत बोललो. वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिलाय. मिठी नदीच्या जवळ धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर सुरक्षित स्थळी आवश्यकता वाटली तर शिफ्ट करण्याची सोय यासाठी आढावा घेतलाय. सर्वांना सुट्टी दिली असली तरी जो बेसिक रुट सुरु राहिल याची खबरदारी घेतली आहे. सखल भागातील पंप सुरु राहतील याची काळजी घेतली आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
ठाणे घोडबंदर रोड, वसई अहमदाबाद हायवे,ठाणे, वसई विरार, सुरत कडे जाणारे रस्ते जलमय झाले आहेत मुसळधार पावसाने रोड ची अशी अवस्था झाली आहे. सर्वत्र पाणी भरले आहे.
मध्य रेल्वेच्या विक्रोळी ते सायन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. पाण्यातून मार्ग काढून सुरू असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुर्ल्यातून नागरिकांना स्थलांतरासाठी आवाहन करण्यात येत आहे. पोलिस प्रशासन या पट्यात नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत आहे.
वसईच्या मिठागराला चारी बाजूने पाण्याने वेढा टाकला असून, १०० कुटुंब आत मध्येच अडकले आहेत. वसई विरार नालासोपारा परिसरात अक्षरशः आभाळ फाटल्या प्रमाणे मुसळदार पाऊस पडत आहे. मिठागर मधील नागरिकांच्या घरात गुडगाभर पाणी साचले असल्याचे सांगितले आहे. मिठागर मधून बाहेर निघायचे असेल तर गळ्या इतक्या पाण्यातून बाहेर पडावे लागत आहे.
सायन पनवेल हायवे रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठी ट्रॅफिक जाम झाली आहे.
रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, रात्रीपासून पाऊस सुरू आहे. नागोठणे मधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या पाणी पातळी ८.८५ मीटरवर आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस म्हसळा तालुक्यात नोंदला गेला असून तिथे २५१.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण जिल्ह्यात १८८.४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे
पुढील चार तासांसाठी मुंबईसाठी अलर्ट मोड देण्यात आला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या काळात धुवाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्ग जलमय झाला. महामार्गावरील सासुपाडा, मालजीपाडा, चिंचोटी परिसरात महामार्गावर पाणी साचल्याने महामार्ग ठप्प झाला आहे.
राज्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक तर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सगळे जण परस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्याचे आकडेवारी 12 वाजेपर्यंत येतील. जनावरे वाहून गेली आहेत. रत्नागिरी, खेड, चिपळून या भागात पाण्याची धोक्याची पातळी वाढली आहे. संपूर्ण राज्यात पावसाची संततधार आहे. काही गावं पाण्याखाली आहे. संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे.
कोयना धरणाचे सहा दरवाजे नऊ फुटांनी उघडले जाणार आहे. 11 वाजता कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे.
राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. पंचनामे काम करण्याचे काम सुरू होतील. जिथे पुराचा फटका, पावसाचा फटका बसला आहे, तिथे बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर जलसंपदा विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे पाणी सोडताना खबरदारी घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.