AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाची आज ‘महा पत्रकार परिषद’; उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण-कोण उपस्थित असणार? वाचा…

Shivsena Uddhav Thackeray Grand Press Conference : मुंबईतील वरळीत होणाऱ्या महा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण-कोण असणार? उद्धव ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? वरळी भागात शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. वाचा सविस्तर...

ठाकरे गटाची आज 'महा पत्रकार परिषद'; उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण-कोण उपस्थित असणार? वाचा...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 16, 2024 | 12:29 PM
Share

सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना पक्ष कुणाचा अन् आमदार अपात्रता प्रकरणाचा नुकतंच निकाल आला. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजून लागला. यानंतर आता लढाई जनतेच्या कोर्टात अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 4 वाजता महा पत्रकार परिषद होणार आहे. या महापत्रकार परिषदेला ‘जनता न्यायालय’ असं नाव देण्यात आलं आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय डोम इथं ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. वरळी भागात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

ठाकरेंसोबत कोण-कोण असणार?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः पत्रकार परिषदेत संबोधित करतील. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे देखील उपस्थित असणार आहे. त्याच सोबत काही ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक सर्व सामान्य जनता आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील वरळी डोम इथं उपस्थित असतील.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे काय?

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यातील विसंगती कायदे तज्ञ समजून सांगतील अशी माहिती आहे. निकालातील ठळक आणि महत्त्वाचे त्रुटी असलेले मुद्दे या महापत्रकार परिषदेमध्ये समजून सांगणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा कशा पद्धतीने ठाकरे गटाच्या बाबतीत चुकीचा आहे? हे आपल्या भूमिकेतून या पत्रकार परिषदेत सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाईल.

उद्धव ठाकरेंची आज ‘जनता न्यायालय’ महा पत्रकार परिषद आहे. वरळी इथे ठाकरे पक्षाची तुफान बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या परिषदेत कायदेपंडितही उपस्थित राहणार आहेत. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात जो निकाल दिला. त्यावर आज उद्धव ठाकरे बोलणार आहेत.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान