Mumbai | महापालिका खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबवणार, लसीकरणाला गती देण्यासाठी प्रयत्न!

गेल्या दोन वर्षांत देशामध्ये कोरोनाने कहर केला होता, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंदच होती. मात्र, असे असताना देखील लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. अजूनही देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. सध्या राज्यात कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीयेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Mumbai | महापालिका खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबवणार, लसीकरणाला गती देण्यासाठी प्रयत्न!
k
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 10:24 AM

मुंबई : 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली असली तरीही आतापर्यंत फक्त 23 टक्के मुलांचा डोस देण्यात आले. या वयोगटातील मुंबईमध्ये (Mumbai) जवळपास चार लाख मुले आहेत. मात्र, या मुलांनी अद्यापही लस घेतली नाहीये. अनेक पालक आपल्या मुलांना लस देणे टाळत आहेत. ही लसीकरण मोहिम अधिक फास्ट करण्यासाठी महापालिका (Municipal Corporation) आता खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबवणार आहे. यामुळे 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला वेग मिळेल हे नक्की आहे.

खासगी शाळेंमध्ये राबणार लसीकरण मोहिम

गेल्या दोन वर्षांत देशामध्ये कोरोनाने कहर केला होता, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंदच होती. मात्र, असे असताना देखील लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. अजूनही देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. सध्या राज्यात कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीयेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे, शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.

हे सुद्धा वाचा

लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम

लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. 13 जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणला अपेक्षित गती मिळालेली नाही. या वयोगटात केवळ 17 टक्के मुलांनी दुसरा डोस घेताला आहे. यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी महापालिकेकडून हा खास उपक्रम राबविला जात आहे. देशामधील कोरोना रूग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी आहे. परत एकदा देशात कोरोनाने पास पसरवण्यास सुरूवात केलीयं. यामुळे लसीकरणाशिवाय पर्याय नाहीये.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें