हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव, ‘नायर’च्या शतकसोहळ्यात उद्धव ठाकरेंकडून 100 कोटींची घोषणा

राज्यात सर्वत्र मंदिरं बंद आहेत, मात्र कोरोनाकाळात खरे देव कोण हे आपण पाहिलं आहे. हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव, 'नायर'च्या शतकसोहळ्यात उद्धव ठाकरेंकडून 100 कोटींची घोषणा
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 3:26 PM

मुंबई : “राज्यात सर्वत्र मंदिरं बंद आहेत, मात्र कोरोनाकाळात खरे देव कोण हे आपण पाहिलं आहे. हॉस्पिटल म्हणजे मंदिर, तर डॉक्टर म्हणजे देव आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील नायर रुग्णालयाला (Nair Hospital) 100 वर्ष पूर्ण झाली. त्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इतकंच नाही तर या रुग्णालयाला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने नायर हॉस्पिटलला 100 कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं. पारतंत्र्याचं 25 वर्षे, जिद्द काय असू शकतं हे त्याचं अप्रतिम उदाहण आहे.

जिद्द असेल तर काही नसलं तरी करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. व्यथा घेऊन जसं मंदिरात जातो तसं कुणीतरी दुर्दर आजाराने त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण बरे होऊन हसतखेळत जातात. त्यामुळे तुमच्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो.

VIDEO : उद्धव ठाकरे यांचं भाषण

संबंधित बातम्या 

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.