राजकारण आणि प्रोटोकॉलमध्ये उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेपेक्षा मी सीनियर, निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव टाकल्याने राणे नाराज

| Updated on: Oct 08, 2021 | 4:44 PM

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (narayan rane reaction on chipi airport inauguration function)

राजकारण आणि प्रोटोकॉलमध्ये उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेपेक्षा मी सीनियर, निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव टाकल्याने राणे नाराज
narayan rane
Follow us on

मुंबई: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मीच सीनियर असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले.

तेव्हा चिल्लर कुठे होते?

यावेळी त्यांनी सिंधुदुर्गाचा विकास आपणच केल्याचं सांगितलं. तसेच चिपी विमानतळाचं कामही आपणच मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं. 1990 मध्ये पहिल्यांदा मी सिंधुदुर्गातून आमदार झालो. रस्ते नव्हते, डांबरीकरणाचा पत्ता नव्हता, शैक्षणिक सुविधा नव्हत्या. जिल्ह्यात भात सोडला तर दुसरं पिक नव्हतं. गरीबी होती. ऊदरनिर्वाहासाठी औद्योगिकीकरण नव्हतं. दरिद्री जिल्हा म्हणून संबोधलं जायचं. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी टाटा कंपनीकडे गेलो. टाटांनी काही महिन्यानंतर रिपोर्ट दिला. सिंधुदुर्गाच्या विकासाची ती ब्लू प्रिंटच होती. पर्यटनानेच हा जिल्हा विकसित होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. ते समजल्यानंतर मी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी प्रयत्न केले. आता जी चिल्लर फिरतेय ना बाजारात… जे म्हणतात ना आम्हीच केलं, आम्हीच केलं… तेव्हा हे कुठेच नव्हते, अशी टीका त्यांनी केली.

चिपीचं काम आम्हीच केलं

चिपी विमानतळाचं काम मीच केलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आहेत. शिवसेनेचं काहीही श्रेय नाही. या कामाचं श्रेय माझं आणि भाजपचं आहे, असं सांगतानाच उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमातही आम्हीच हे काम आम्ही केल्याचं सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वाद नाही. वैर नाही. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. सिंधुदुर्गाच्या माव्हऱ्याचा पाहुणचार करू, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असं त्यांनी सांगितलं.

काम केलं कुणी आणि मिरवली कुणी?

जिल्ह्यात पर्यटनाला काय काय लागतं. युरोपातून आल्यावर त्यांच्या आवडीनिवडी याचा अभ्यास टाटा कंपनीने केला होता. आम्ही सर्व हॉटेल मालकांना बोलावून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी इन्फ्रा स्ट्रक्चर चांगले हवं हे लक्षात आलं. मी मुख्यमंत्री झालो आणि कामे सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांनी मला मोठी साथ दिली. मोठा निधी कोकणात नेला आणि रस्ते तयार केले. पाण्याचा प्रश्न सोडवला. तेव्हा हे विनायक राऊत कुठे होते? काय फिरतो? कुठे बोलतो? राणेंविरोधात बातमी द्यायला पुढे असतो. तो शिवी घालतो त्याची बातमी काय दाखवता. केलं कुणी मिरवतंय कोण? म्हणूनही प्रेस घेतली, असं त्यांनी सांगितलं.

विमानतळासाठी पटेलांना भेटलो

त्यावेळीच विमानतळाचा विचार मनात आला होता. त्यानंतर विमानतळ करायचं ठरवलं. त्यासाठी विमानतळाची जागेची पाहणी केली. कुमारमाठला डिस्नेलँड येणार होते. सावंतवाडीच्या डोंगरात रोप वे येणार होते. अशा गोष्टीसह पर्यटकांसाठी 28 पॉइंट विकसित करायचं ठरवलं होतं. परदेशी पर्यटक आला तर कमीत कमी सात दिवस राहावा. त्याने पाच लाख रुपये तरी खर्च करावेत आणि हे पैसे स्थानिकांच्या घरात जावे हा हेतू होता. उद्योग धंदे भरभराटीला यावा हे हेतू होता. त्यामुळे विमानतळाची साईट निवडली. तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांनी ग्रीन फिल्ड विमानतळ बनवण्याचं जाहीर केलं. तेव्हा मी त्यांना फोन केला आणि भेटायला गेलो. त्यांना ग्रीनफिल्ड विमानतळ मागितलं. त्याबदल्यात त्यांच्या जिल्ह्यातीली महसूली कामे केली, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Pune Corona Update : हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु होणार, नाट्यगृहसुद्धा उघडणार, अजित पवारांकडून पुण्याला मोकळं करण्याचा प्लॅन जाहीर

शेट्टी, खोत म्हणतात, ऊसाची एकरकमी द्या, पवार म्हणाले, गुजरातकडे बघा, शेतकऱ्यांचा कसा फायदा झाला?

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; सासरा म्हणतो जावयानं दारुच्या नशेत फोन केला!

(narayan rane reaction on chipi airport inauguration function)