मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:49 PM, 5 Mar 2019
मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला?

मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला होऊ शकतो, अशी भीती नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आपला शेजारील देश (पाकिस्तान) समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं.


जम्मू-काश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोट घडवला. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. शिवाय, भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावाची स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतातील सुरक्षा व्यवस्थेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आता पाकवर नेव्हीचा स्ट्राईक? भारतीय पाणबुडी घुसल्याचा पाकचा दावा

याचवेळी भारतीय नौदलप्रमुख सुनिल लांबा यांनी 26/11 सारखा मुंबईवर पुन्हा हल्ला होण्याची भीती वर्तवल्याने, सगळ्यांचीच चिंता आणखी वाढली आहे.