VIDEO : नवी मुंबईत ड्रायव्हरसह स्कार्पिओ नदीपात्रात अडकली

पनवेलमधील देवत गावाजवळ एक स्कार्पिओ नदीपात्रात अडकली. ही स्कार्पिओ गावकऱ्यांनी दोरी लावून पलीकडच्या काठावरुन बाहेर काढली.

VIDEO : नवी मुंबईत ड्रायव्हरसह स्कार्पिओ नदीपात्रात अडकली
| Updated on: Jun 29, 2019 | 3:56 PM

नवी मुंबई :  पनवेलमधील देवत गावाजवळ एक स्कार्पिओ नदीपात्रात अडकली. ही स्कार्पिओ गावकऱ्यांनी दोरी लावून पलीकडच्या काठावरुन बाहेर काढली.  या सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. थरारक म्हणजे यावेळी गाडीत ड्रायव्हर देखील होता. अचानक नदीचे पाणी वाढल्याने गाडी वाहून जात होती. यावेळी ग्रामस्थांनी आधी गाडीतील चालकाला बाहेर काढलं. त्यानंतर जेसीबीला दोरी लावून स्कार्पिओला पाण्याबाहेर काढलं.

नवी मुंबईत जोरदार पाऊस

दरम्यान, नवी मुंबईसह रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. गेल्या चार दिवसापासून इथे पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदी,नाले ओसंडून वाहात आहेत. नवी मुंबईत ही परिस्थिती असताना इकडे मुंबईतही जोरदार पाऊस बरसत आहे. काल पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने रेल्वे वाहतूकही उशिरा सुरु होती.