मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ; तिसरी पोलखोल करण्यापूर्वीच नवाब मलिक यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहेत. मलिक आज या पार्टीच्या संदर्भात तिसरी पोलखोल करणार आहेत. (nawab malik slams bjp over drugs party)

मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ; तिसरी पोलखोल करण्यापूर्वीच नवाब मलिक यांचं ट्विट
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहेत. मलिक आज या पार्टीच्या संदर्भात तिसरी पोलखोल करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेले असतानाच त्यांनी एक ट्विट केलं आहे. मलिक यांनी एक शेर ट्विट केला असून त्यामुळे त्यांच्या या सूचक ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्विट केलं आहे. मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।, असं सूचक ट्विट त्यांनी केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळीच धमाका

नवाब मलिक आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत एनसीबीची पोलखोल करण्यात येणार आहे. त्यामुळे मलिक एनसीबीवर नवीन काय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिकांचा आरोप काय?

नवाब मलिक यांनी याआधी एनसीबीला सवाल केले होते. यावेळी त्यांनी एनसीबीला एक सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असे मलिक म्हणाले होते.

नवाब मलिकांकडून प्रश्नांची सरबत्ती

“काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली होती.

“भाजपकडून बॉलिवूड-राज्य सरकारची बदनामी”

भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता, 21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

 

संबंधित बातम्या:

कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर विधानपरिषद निवडणूक : परिचारकांच्या जागेसाठी भाजपकडून कोण? मविआतर्फे शिवसेना की राष्ट्रवादी?

नवरात्रीत पेरलेली ज्वारीची बियाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?; वाचाल तर तुम्हीही थक्क व्हाल!

(nawab malik slams bjp over drugs party)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI