सोलापूर विधानपरिषद निवडणूक : परिचारकांच्या जागेसाठी भाजपकडून कोण? मविआतर्फे शिवसेना की राष्ट्रवादी?

विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यंदाही विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगत होणार आहे.

सोलापूर विधानपरिषद निवडणूक : परिचारकांच्या जागेसाठी भाजपकडून कोण? मविआतर्फे शिवसेना की राष्ट्रवादी?
Dilip Mane, Prashant Paricharak

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या सदस्यपदाची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगत होण्याची चिन्हं आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून नोव्हेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयाकडून प्राथमिक तयारी सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 419 मतदार असून त्यापैकी 410 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप?

विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. त्यापूर्वीच विधान परिषदेची निवडणूक घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यंदाही विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच रंगत होणार आहे.

भाजपकडून पुन्हा प्रशांत परिचारक?

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत झाली होती. यंदा दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण असतील हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. मात्र भाजपकडून पुन्हा एकदा आमदार प्रशांत परिचारक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून शिवसेनेत असलेले माजी आमदार दिलीप माने यांना संधी देण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होण्यास 15 ते 20 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्याआधी दोन्ही पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत प्रशांत परिचारक?

प्रशांत परिचारक हे पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे
प्रशांत परिचारक भाजपकडून सोलापूर विधानपरिषदेवर सहयोगी आमदार
2017 मध्ये भारतीय लष्करातील जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य
2017 मध्ये दीड वर्षासाठी निलंबन

कोण आहेत दिलीप माने?

दिलीप माने हे काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून 2009 मध्ये आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑगस्ट 2019 मध्ये काँग्रेसची साथ सोडत माने त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागता.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंनी समोरासमोर बसवून आम्हा दोघांना तिकीटावर निर्णय घेण्यास सांगितलं : दिलीप माने

काँग्रेसचा माजी आमदार, शिवसेनेकडून प्रणिती शिंदेंना भिडला, आता ‘घड्याळ’ बांधण्याच्या वाटेवर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI