सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव; राष्ट्रवादीचा आरोप

| Updated on: May 29, 2021 | 2:12 PM

व्हॉट्सॲप प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (Nawab Malik slams Central Government over WhatsApp Controversy)

सोशल मीडियाला संपवणं, लोकांना तुरुंगात टाकणं हाच केंद्राचा डाव; राष्ट्रवादीचा आरोप
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: व्हॉट्सॲप प्रायव्हसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. व्हॉटसॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर त्यांना शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारचा हा सारा खेळ सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. (Nawab Malik slams Central Government over WhatsApp Controversy)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. आज भाजप केंद्रात सत्तेत आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच भाजप सत्तेवर आली आहे. आता त्याच सोशल मीडियावर भाजप आज अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

केंद्राविरोधातील वातावरणामुळे…

सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनता केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहे. आपलं म्हणणं प्रखरतेने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

भाजपच्या कुटील डावाला विरोध

आज व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु न्यायालय व्हॉटस्ॲप चॅट कायदेशीर पुरावा मानत नाहीये. परंतु, केंद्रातील भाजप सरकार व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल व्हावेत. त्याआधारे लोकांना शिक्षा व्हावी या प्रयत्नात आहेत. दरम्यान भाजपच्या या कुटील डावाचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याच्या कार्यक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Nawab Malik slams Central Government over WhatsApp Controversy)

 

संबंधित बातम्या:

WhatsApp Controversy | सोशल मीडियाबाबतच्या नव्या नियमांमुळे नागरिकांनी घाबरू नये : केंद्र सरकार

जाणून घ्या काय आहे ‘राइट टू प्रायव्हसी’, व्हॉट्सअ‍ॅपच्या विवादानंतर आले चर्चेत

नव्या डिजिटल नियमांचे पालन करु; केंद्र सरकारसमोर Facebook ची माघार

(Nawab Malik slams Central Government over WhatsApp Controversy)