जयंत पाटील यांच्यापाठोपाठ मुलालाही कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार

| Updated on: Mar 01, 2021 | 4:11 PM

त्यापाठोपाठ प्रतीक पाटील यांनाही कोरोना झाला आहे. (NCP Jayant Patil Son Prateek Patil tested Corona Positive)

जयंत पाटील यांच्यापाठोपाठ मुलालाही कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार
प्रतीक पाटील
Follow us on

सांगली : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ प्रतीक पाटील यांनाही कोरोना झाला आहे. (NCP Jayant Patil Son Prateek Patil tested Corona Positive)

“नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी, अशी माहिती प्रतीक पाटील यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा,” असे आवाहनही प्रतीक पाटील यांनी केले आहे.

प्रतीक पाटील यांची फेसबुक पोस्ट

जयंत पाटील यांनाही लागण

जयंत पाटील 18 फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती. जयंत पाटील हे सध्या मुंबईतील घरात क्वारंटाईन आहे. त्याच ठिकाणी ते उपचार घेत आहेत. त्यानंतर आता प्रतीक पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीकही मुंबईत क्वारंटाईन असल्याचे सांगितले जात आहे.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं.

जयंत पाटील यांचे ट्वीट 

प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात सांगलीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रतीक जयंत पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले होते.  आष्ठा ते इस्लामपूर या मार्गावरुन हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

“शेतकऱ्यांची बाजू ऐकणं केंद्राने टाळलं”

नवीन आलेल्या कृषी कायद्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकणं केंद्र सरकारने टाळलं आहे. शेतकरी आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अनेक राज्यातील शेतकरी हे स्वतःची शेती सोडून दिल्लीत पोहोचले आहेत, याकडे प्रतीक पाटलांनी लक्ष वेधलं. (NCP Jayant Patil Son Prateek Patil tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात