AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: कोकणात ठाकरे सेनेचं… सुनील तटकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया… राऊतांवर काय टीका?

Sunil Tatkare on Uddhav Thackeray Shivsena: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकणातील उद्धव ठाकरे सेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोकणातील घडामोडींवर त्यांनी राऊतांना चिमटा काढला. काय म्हणाले सुनील तटकरे?

Sunil Tatkare: कोकणात ठाकरे सेनेचं... सुनील तटकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया... राऊतांवर काय टीका?
सुनील तटकरेंचा ठाकरे सेनेवर हल्लाबोलImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 1:49 PM
Share

Sunil Tatkare on Uddhav Thackeray Shivsena: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे सेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. कोकणात आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा जोरदार टोला सुनील तटकरे यांनी लगावला.

विनायक राऊतांवर टीकेची झोड

उद्धव ठाकरे यांचे खासदार विनायक राऊत यांनी बाळा माने यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी 25 कोटी रुपये घेऊन उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप केला. त्यावर खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत तोंडसुख घेतले. विनायक राऊत हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले असे ते म्हणाले. आपल्या पक्षाचं कोकणात काय स्थान राहिलं हे दूर्बिण घेऊन राऊतांनी शोधावं असा टोला तटकरे यांनी लगावला. एकेकाळी कोकण हा बाळासाहेब यांच्या विचारांचा बालेकिल्ला होता. तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहिलेला नाही. त्यांना दोन अंकी सुद्धा आकडा गाठता आला नाही. तर कोकणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला झाला आहे. तुमचे मोजून मतदार 45 आहेत, अशावेळी दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात, याचे आत्मपरीक्षण विनायक राऊत यांनी करावे असा जोरदार टोला तटकरे यांनी लगावला.

रोहित पवार यांच्यावर टीका

रोहित पवार यांनी एक ट्विट केले. त्यात सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. अशोक खरात सोबत तटकरेही कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. तर एकाच घरात तीन तीन पदं देण्यात आल्यावरही रोहित पवार यांनी टिका केली आहे. त्यावर सुनील तटकरे यांनी मत व्यक्त केले. मी निवडून आलेलो लोकसभेचा सदस्य आहे. माझ्याकडे असंच ते पद आलेले नाही. परिश्रमातून, स्वतःच्या ताकदीवर, जनतेच्या पाठिंब्याने मी निवडून आलो आहे. पाच वेळा मी विधानसभेवर निवडून गेलो आहे. माझ्याकडे असेच पद नाही आली, त्यामागे मेहनत आहे. आदिती तटकरे या दोनदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. कोणाच्या मेहरबानीवरती आम्ही काम केलेले नाही. मी कधीच कामाख्या देवीला कुणासोबत गेलेलो नाही. मी जे यश मिळवलं हे ज्यांना पाहवत नाही ,ज्यांची दुर्दशा जनतेने केली आहे. त्या नैराशेपोटी अलिकडे भरकटलेली मनोवृत्ती दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न काहींच्या मार्फत केल्या जात असल्याचा टोला तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

तर राज्यसभेची जागा भाजप घेण्यास इच्छुक असल्याबाबत काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 8 तारखेला राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर पक्षाचा उमेदवार अर्ज भरणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. तरीही अजून त्यांनी उमेदवार कोण असेल याविषयी भाष्य केलेले नाही. महायुतीचे सगळे उमेदवार आम्ही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जी यादी जाहीर केली त्यांना आमचा पाठिंबा आहे. यवतमाळची जागा बीनविरोध झाली जामकर यांचा अर्ज मागे झाला. कोणतीही आघाडी किंवा पक्ष संपुष्टात येत नसतो. राजकिय पक्षात चढउतार होत असतात. पण ते सगळे जसे एकत्र आले नरेंद्र मोदी द्वेषाची कावीळ होते तेंव्हा ते एकत्र आले त्यानंतर त्यांची जी शकलं व्हायची ती होतात. माझ्या राजकिय जीवनात मी नेहमी संयमाने राहीलो. मी कधी टोकाची टिका केली नाही. मी टोकाचे प्रत्युत्तर दिले नाही. मी देवेंद्रजींचे आभार मानतो शिंदे साहेबांचे आभार मानतो सुनेत्रा वहिनी आमच्या नेत्या आहेत त्यांचे औपचारिक आभार माननणाचे कारण नाही. जनता सगळे पाहते आहे. विचार स्वातंत्र्य आहे सगळ्यांना आपल्या देशात असे अनेक राजकिय पक्ष आपण पाहिले नाही. मी एका पक्षाचा जबाबदार अध्यक्ष आहे, असे तटकरे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...