Prakash Ambedkar : यशंवत सिन्हांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी, प्रकाश आंबेडकरांनी दिलं कारण

| Updated on: Jul 16, 2022 | 3:42 PM

प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटमुळे आता तेही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी अनुसुचित जाती आणि जमातीतील सदस्यांचा संदर्भ देत यशवंत सिन्हा यांना माघार घेण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Prakash Ambedkar : यशंवत सिन्हांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी, प्रकाश आंबेडकरांनी दिलं कारण
Follow us on

मुंबईः राज्यासह देशात सध्या राजकीय वातावरण वेगवेगळ्या गोष्टीमुळे तापले आहे, कधी राज्यसभा तर कधी विधानसभा तर कधी बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हे चालू असतानाच आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे (Presidential elections) वारे जोरदार वाहू लागले आहे. मंगळवारी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Presidential candidate Draupadi Murmu) येऊन गेल्या आहेत, त्यानंतर आजच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi LeaderPrakash Ambedkar) यांच्या ट्विटमुळे राज्यासह देशातील वातावरण आता पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज ट्विट केले आहे की, “यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची विनंती करत आहे कारण, अनेक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी इच्छूक आहेत.” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

 

प्रकाश आंबेडकरांचा एनडीए उमेदवाराला पाठिंबा

प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटमुळे आता तेही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी अनुसुचित जाती आणि जमातीतील सदस्यांचा संदर्भ देत यशवंत सिन्हा यांना माघार घेण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांनीही दिला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, या पदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाच्या घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या उमेदवारीची आठवण सांगताना म्हणाल्या की, ज्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अशी संधी मिळाली नव्हती, मात्र मला माझ्या उमेदवारीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करुन मला ही माहिती दिली होती. त्यानंतर आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वासही त्यांनी त्यावेळी मला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या राजकीय घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अशी भूमिका घेतली असल्याने आता यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी काय निर्णय घेतात ते आता येणारा काळच ठरवणार आहे.