AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena: मी गद्दारी केलेली नाही मी राजीनामा देणार नाही ; उद्धव ठाकरेंना वाटलं ठेवतील नाही तर…; विश्वनाथ भोईरांनी कारवाईवर दिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षाच्या 40 बंडखोर आमदारामध्ये सुरुवातीपासूनच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर होते. इतर आमदाराचा बंडखोरीचा प्रवास 19 तारखेपासून सुरू झाला असला तरी भोईर यांचा प्रवास 13 जून पासूनच सुरू झाला होता. बंडखोरीनंतर सत्ता स्थापन होताच 21 दिवसांनी आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदार संघात परतले यांनातर आज त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

Shivsena: मी गद्दारी केलेली नाही मी राजीनामा देणार नाही ; उद्धव ठाकरेंना वाटलं ठेवतील नाही तर...; विश्वनाथ भोईरांनी कारवाईवर दिली प्रतिक्रिया
| Updated on: Jul 16, 2022 | 4:08 PM
Share

कल्याणः कल्याण पश्चिमचे आमदार असलेले विश्वनाथ भोईर (Kalyan West MLA Vishwanath Bhoir) यांची शिवसेनेच्या कल्याण शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी (Removal from the post of city chief) करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कल्याण शहराचा शहरप्रमुख म्हणून माझी नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Leader Uddhav Thackeray) यांनी केली असून मी गद्दारी केलेली नाही मी राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा कल्याण पश्चिमचे आमदार व शिंदे समर्थक विश्वनाथ भोईर यांनी घेतला आहे.

पक्ष प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांना वाटले तर या पदावर मला ठेवतील अन्यथा काढून टाकतील हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल असेही स्पष्ट करायला भोईर विसरले नाहीत.

दि.बा. पाटील नामाकरण घाईगडबडीत

दिबा पाटील नामाकरणप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असताना विमानतळाचे दिबा पाटील नामाकरण हे घाईघाईत घेतला आहे, तो निर्णय ज्या मंत्रिमंडळात घेतला गेला आहे, ते मंत्रिमंडळ वैद्य आहे की अवैध आहे हे अजूनही ठरले नाही असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

भोईर सुरुवातीपासूनच बंडखोर गटात

शिवसेना पक्षाच्या 40 बंडखोर आमदारामध्ये सुरुवातीपासूनच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर होते. इतर आमदाराचा बंडखोरीचा प्रवास 19 तारखेपासून सुरू झाला असला तरी भोईर यांचा प्रवास 13 जून पासूनच सुरू झाला होता. बंडखोरीनंतर सत्ता स्थापन होताच 21 दिवसांनी आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदार संघात परतले यांनातर आज त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच

यावेळी बोलताना त्यांनी आपण आजही शिवसैनिक असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला मिळणारी तुच्छ वागणूक आणि मतदार संघात काढल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल यासारखी वक्तव्ये केली जात होती.

गद्दारीची व्याख्या काय

यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण पाठिंबा दिला असून आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक असताना जर आम्हाला गद्दार ठरवले जाणार असेल तर गद्दारीची व्याख्या सविस्तर पणे मांडली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

शिंदेंना वाटलं तर मंत्रीपद देतील

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सगळ्याच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे, याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याला मंत्रिमंडळाबद्दल काही सांगितलं नाही एकनाथ शिंदेंना वाटलं तर मंत्रीपद देतील अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.