VIDEO: जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांची वर्दळ, कामं वाजवली जाताहेत; राज ठाकरेंचा हल्लाबोल

| Updated on: Aug 31, 2021 | 2:02 PM

राज्य सरकारने सणांवर घातलेल्या निर्बंधावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (raj thackeray attacks shiv sena over builder rush at mayor's bungalow)

VIDEO: जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांची वर्दळ, कामं वाजवली जाताहेत; राज ठाकरेंचा हल्लाबोल
raj thackeray
Follow us on

मुंबई: राज्य सरकारने सणांवर घातलेल्या निर्बंधावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारडून कामं करून घेण्यासाठी जुन्या महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झाल्या नाहीत. कामं वाजवली जात आहे. मग सणांवरच निर्बंध का?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. (raj thackeray attacks shiv sena over builder rush at mayor’s bungalow)

बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. सरकारकडून कामं करून घेण्यासाठी येणाऱ्या या गाड्या काही कामी झाल्या नाहीत. कुठेच काही गोष्टी कमी झाल्या नाहीत. मग सणांवरच का येता? असा सवाल राज यांनी केला.

सर्व सुरू, मग मंदिरच का बंद

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू. आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल त्यांनी केला.

नियम सर्वांना सारखेच हवे

मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

हजारो कोटींची कामे वाजवली जाताहेत

गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मेळावे, मोर्चे होत आहेत. यांच्या हाणामाऱ्या होत आहेत. तेव्हा कोरोना होत नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

स्मारकाचा विरोध जुनाच

दरम्यान, राज ठाकरे यांनी पूर्वीही महापौर बंगल्यातील ठाकरे स्मारकाला विरोध केला होता. बाळासाहेबांच्या जागेसाठी भव्य जागा निवडण्याऐवजी मुंबईच्या महापौरांचा बंगला बळकविण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असं विधान करून राज ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली होती. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर 2015मध्ये हे विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आजही त्यांनी बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत, असं विधान करून शिवसेनेला डिवचलं आहे. (raj thackeray attacks shiv sena over builder rush at mayor’s bungalow)

संबंधित बातम्या:

भाजपच्या भूमिकेला मनसेची पहिली साथ? मंदिर उघडण्यासाठी राज ठाकरे आक्रमक

मंदिरे सुरू करा नाही तर मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करू; राज ठाकरेंची गर्जना

दहीहंडीवरुन कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल, राज ठाकरे म्हणतात अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत

(raj thackeray attacks shiv sena over builder rush at mayor’s bungalow)