मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका

MNS Raj Thackeray: मी दोन विषयांसाठी आयुक्तांच्या भेटीसाठी आलो होतो. मुंबई मनपाच्या जमिनीखालून जाणारा केबलचा एक विषय होता. त्या केबल मनपाच्या जमिनीच्या खालू जात असताना त्यांच्याकडून कोणताही कर घेतला जात नाही.

मनपा निवडणुकीची मनसेची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका
Raj Thackeray
| Updated on: Feb 21, 2025 | 3:15 PM

MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आता आयुक्तांची घेतलेली भेट आणि मुंबई शहरातील प्रश्नावर केलेली चर्चा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनपा निवडणुकीची तयारी म्हटली जात आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयुक्तांची का भेट घेतली, त्याची कारणे दिली.

या कंपन्यांना कर लावण्याची मागणी

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी दोन विषयांसाठी आयुक्तांच्या भेटीसाठी आलो होतो. मुंबई मनपाच्या जमिनीखालून जाणारा केबलचा एक विषय होता. त्या केबल मनपाच्या जमिनीच्या खालू जात असताना त्यांच्याकडून कोणताही कर घेतला जात नाही. मनपा सर्व नागरिकांकडून कचरा संकलनासाठी कर घेते. परंतु मनपाच्या जमिनीखाली जाणाऱ्या केबलसाठी कर का लावत नाही. तो कर लावला तर आठ ते दहा हजार कोटींचे उत्पन्न मनपाला मिळेल. सर्वांना कर लावले जात आहे, मग जमिनीखाली केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून कर का आकारला जात आहे. त्या कंपन्या धर्मादाय संस्था नाही. त्या स्वत: त्यातून नफा कमवत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

परराज्यातील रुग्णांकडून शुल्क घ्या

राज ठाकरे यांनी आयुक्तासोबत मनपा रुग्णालयाबाबत चर्चा केली. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुंबई मनपाच्या हॉस्पिटलचा विषयावर आयुक्तांसोबत चर्चा झाली. या हॉस्पिटलमध्ये परराज्यांमधून रुग्ण येत आहे. त्यामुळे मुंबई मनपाच्या रुग्णालयावर खूप ताण पडत आहे. मुंबई मनपा रुग्णालयात महाराष्ट्रातील रुग्ण येऊ शकतात, परंतु दुसऱ्या राज्यातील रुग्णांसाठी काही वेगळे शुल्क लावता येतील का? या विषयी आयुक्तांसोबत चर्चा झाली.

पीओपी मूर्तींवर लादली गेलेल्या बंदीबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, मूर्तीकरांनी बदलले पाहिजे. मूर्तीकारांनी दरवर्षी तोच तोच प्रश्न कसा निर्माण करु शकतो. पीओपीच्या मूर्त्यांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान खूप मोठे आहे.