अभिजीत दीपकेंना जोरदार झटका, थेट रामदास आठवलेंचा इशारा; म्हणाले, खबरदार, नाही तर…

अभिजीत दीपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दीपके यांना सज्जड इशारा दिला असून, बाबासाहेबांचा अवमान करणारी बेताल विधाने थांबवून तातडीने माफी मागण्याची मागणी केली आहे.

अभिजीत दीपकेंना जोरदार झटका, थेट रामदास आठवलेंचा इशारा; म्हणाले, खबरदार, नाही तर...
ramdas athawale
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 3:56 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्यामुळे आपल्याला मताचा अधिकार मिळाला, असं विधान कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी केलं आहे. दीपके यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. दीपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. ही मागणी होत असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दीपके यांना सज्जड इशारा दिला आहे. दीपके यांनी बेताल आणि चुकीची विधाने करणं बंद करावं, नाही तर त्यांना अस्मान दाखवू, असा इशाराच रामदास आठवले यांनी दिला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. अभिजित दीपके यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना पुढे आणले, असे विधान दीपके यांनी केले असून त्यांच्या या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे संपूर्ण देशाला पुढे आणले आहे. इतिहास विसरून चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिजित दीपके यांच्या डोक्यात हवा शिरली आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

Loading...

बेताल विधाने बंद करा

दीपके हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे तसेच अनादर करणारे वक्तव्य करीत आहेत. त्यांनी बेताल वक्तव्य बंद करावीत. नाहीतर रिपब्लिकन पक्ष दीपकेंविरुद्ध कडक पाऊल उचलेल, असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे.

डोक्यात हवा शिरली

दीपकेंना काही विद्यार्थी पाठिंबा देत आहे. ही चांगली बाब आहे. त्यांनी तरुणांच्या या पाठिंब्याचा सदुपयोग करावा. त्यांच्या डोक्यात हवा शिरल्याने ते बाबसााहेबांबद्दल चुकीची विधाने करत आहेत. त्यांनी चुकीचे बोलणे टाळावे. लोकशाहीतून बहुमताने निवडून आलेल्या व्यक्तींवर बोलताना त्यांनी बेछुट विधाने करणं टाळावीत. नाही तर रिपब्लिकन पक्ष कडक भूमिका घेऊन त्यांना अस्मानातून जमिनीवर आणेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दीपके, माफी मागा

मोदींनी देशाचा विकास केला आहे. दीपके आता छत्रपती संभाजी नगरसह राज्यातच्या इतर भागात फिरत आहेत. त्यांनी रस्ते विकास पहिला आहे. त्यामुळे मोदींबद्दल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चुकीचे अवमानकारक बोलणे त्यांनी टाळावे, असा सल्ला देतानाच चुकीचे विधान केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असंही आठवले म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us