पूजाचा व्हिडीओ आला म्हणून लग्न करावं लागलं, सुपाऱ्या घेण्याची आम्हाला भाजपसारखी सवय नाही: चाकणकर

| Updated on: Sep 08, 2021 | 5:57 PM

भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. (rupali chakankar)

पूजाचा व्हिडीओ आला म्हणून लग्न करावं लागलं, सुपाऱ्या घेण्याची आम्हाला भाजपसारखी सवय नाही: चाकणकर
rupali chakankar
Follow us on

मुंबई: भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं, असं सांगतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असा जोरदार हल्ला रुपाली चाकणकर यांनी चढवला आहे. (rupali chakankar reaction on pooja and pankaj tadas re-marriage)

रुपाली चाकणकर यांनी टीव्ही9 मराठी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 6 ऑक्टोबर 202 रोजी वैदिक विवाह मंगल कार्यालय या ठिकाणी पंकज आणि पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्रं होतं. वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता. म्हणून आज विवाह केला. गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी पूजाला विचित्रं वागणूक दिली आहे, तिला वेगवेगळी अमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना समोर आल्यानंतर त्यांना विवाह करावा लागतोय, असं चाकणकर म्हणाल्या.

ते आमचे संस्कार नाहीत

कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडीओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय. यात सुपारी वगैरे घेण्याची आम्हाला भाजप सारखी सवय नाही. त्यांच्या महिला पदाधिकारी कदाचित अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचे संस्कार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कोणतीही तक्रार नाही

लग्नानंतर पूजानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी माझी तक्रार मागे घेतली आहे. आता माझी काही तक्रार नाही. आधीची तक्रार बनवाट विवाह संदर्भात होती. आता रितसर विवाह झाला आहे. त्यामुळे काही तक्रार नाही. मी सकाळी खूप पॅनिक झाले होते. सकाळी गाडी घेऊन जाताना समोरून एक गाडी आली. त्यामुळे मला वाटलं जीवाला धोका आहे. त्यामुळे मी ते विधान केलं होतं. पंकज यांच्याबद्दलही कोणतीही तक्रार नाही, असं पूजाने सांगितलं.

वडिलांनी मला बेदखल केलंय

पंकज तडस यांनीही लग्नानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी पूर्वीही खूश होतो, आताही खूश आहे. मी आधी जे केलं होतं. त्यावर ठाम होतो, आताही ठाम आहे आणि पुढेही ठाम राहील. काही लोकांनी राजकीय सुपारी घेतलेली होती. ती कंपल्सरी मिटली आहे, असं पंकज म्हणाले. गेल्या वर्षभरापासून माझ्या वडिलांनी मला बेदखल केलं आहे. माझ्या वडिलांचा आणि माझा काहीही संबंध नाही. वडिलांना यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे. पूजाला आधीच पत्नी म्हणून स्वीकारलं आहे. 6 ऑक्टोबर 2021ला आमचं नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं. पुन्हा यांच्या विनंतीवरून लग्न करत आहे. मी एका राजकीय घराण्यातून आलो आहे. पंकज तडस हा खासदाराचा मुलगा म्हणून काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती, असं ते म्हणाले. (rupali chakankar reaction on pooja and pankaj tadas re-marriage)

 

संबंधित बातम्या:

दोघांनीही माझ्याकडे राहायला या, सुनेचे मारहाणीचे आरोप खासदार रामदास तडसांनी फेटाळले!

रुपालीताई प्लीज मला घेऊन चला, वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी, कुटुंबाकडून मारहाण?

पुण्यातील सामुहिक बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची अजित पवारांची ग्वाही

(rupali chakankar reaction on pooja and pankaj tadas re-marriage)