आरोपी मुंबईत कधी आले, कसा रचला कट? सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचा मास्टरप्लॅन

गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान घरीच होता. गोळीबार झाला त्यापूर्वी दोन तास म्हणजे तीनच्या सुमारास सलमान घरी आला होता. सलमानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी पोलिसांसह पोलिसांची एक गाडी असते. पण गोळीबार झाला तेव्हा ती गाडी तिथे होती की नव्हती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरोपी मुंबईत कधी आले, कसा रचला कट? सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचा मास्टरप्लॅन
salman khan
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 4:00 PM

रविवारी 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांनी दुचाकीवरून अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपींचा शोध सुरू झाला. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. आरोपींचं लोकेशन माहित होतं पण त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची शक्यता असल्याने स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखाचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना येत्या 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेच्या तपासासाठी 12 पथकं कार्यरत होती.

गोळीबाराच्या या घटनेनंतर लॉरेन्स बिष्नोईचा लहान भाऊ अनमोल बिष्नोईने सोशल मीडियावर पोस्ट लिहून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. ही पोस्ट पोर्तुगाल देशातून अपलोड करण्यात आल्याचं आयपी ॲड्रेसवरून दिसून आलं. पण आरोपींनी प्रत्यक्षात ही पोस्ट पोर्तुगालमधून केली अथवा तंत्रज्ञानाचा वापर करून तसं भासवण्यात आलं, याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

गोळीबार करणारा सागर पाल हा हरयाणात दोन वर्षे कामाला होता. हरयाणात असतानाच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला होता. आरोपींनी गोळीबार करण्यापूर्वी चार दिवस सलमान खानच्या घराबाहेर रेकी केली होती. सीसीटीव्हीच्या तपासणीत आरोपी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून फिरत असल्याचं दिसून आलं. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कुठे फेकले याचा तपास सुरू आहे. दोघांपैकी एकाकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तर एक फोन फोडल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

घटनाक्रम-

  • 28 फेब्रुवारी रोजी दोन आरोपी मुंबई सेंट्रलला उतरले.
  • 1 मार्च रोजी आरोपी पनवेलला पोहोचले.
  • 10 मार्च रोजी आरोपींनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतलं.
  • घर भाड्याने घेताना आरोपींनी आधारकार्ड खरे वापरले.
  • महिना 3500 रुपये भाडं आणि 10 हजार रुपये डिपॉझिट दिले होते.
  • होळीला म्हणजेच 25 मार्चला हे आरोपी त्यांच्या मूळगावी होते.
  • 29 ते 30 मार्चदरम्यान त्यांना वांद्रे इथल्या ताज लँड्सजवळ पाहिलं गेलं.
  • 2 एप्रिल रोजी 24 हजार रुपयांना गुप्ताने दुचाकी विकत घेतली.
  • गुन्ह्यानंतर आरोपी कारने सूरतला गेले, तिथून पुढे एसटीने जात असताना त्यांना पकडलं
Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.