आता तुमची सुटका नाही… पूर्णेकर प्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत संतापले, तासाभरापासून पोलीस ठाण्यात बसून वातावरण तापले

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची पोलीसांकडे मागणी केली आहे.

आता तुमची सुटका नाही... पूर्णेकर प्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत संतापले, तासाभरापासून पोलीस ठाण्यात बसून वातावरण तापले
| Updated on: Sep 30, 2026 | 8:03 PM

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी प्रदीप पूर्णेकरांचा मृतदेह कापूरबावडी पोलीस स्टेशनबाहेर आणून ठिय्या केला आहे. त्यांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्टेशनबाहेर अनेक लोकांनी गर्दी केली आहे. यामुळे वातावरण तापल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे दाखल झाले आहे. संजय राऊतांनी संशयितांची नावे एफआयआरमध्ये नमुद करण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे. शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे या घटनेत संशयित आहे. त्यांच्यावर या हत्येचा आरोप आहे. यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलिसांसोबत चर्चा केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांच्यामुळे हे घटना घडली ते लोक बाहेर आहेत. या हत्येचा मुख्य सूत्रधार मिनाक्षी शिंदे यांचे एफआयआरमध्ये नाव टाका. ही मागणी त्यांच्या कुटुंबियांनीही केली आहे.

Loading...

संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मिनाक्षी शिंदेंना पोलीस संरक्षण मिळाले आहे. या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस ठाण्यात येईल. यानंतर गडबड होईल. एफआयआरमध्ये मिनाक्षी शिंदेचं नाव नाही, तर न्यायाची शाश्वती नाही. एफआयआरमध्ये मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेचे नाव टाका. हा सर्व प्रकार गंभीर आहे. गुन्हेगारांना सुरक्षा दिली जात आहे. आता यातून तुमची सुटका नाही.

ते म्हणाले की, पुरवणीमध्ये पूर्णेकरांच्या मुलाचा जबाब जोडा. मृतदेह रुग्णवाहिकेत आहे. बाहेर गर्दी वाढत आहे. हत्येचा काही काळ आधी पप्या शिंदे पूर्णेकरांशी बोलत होता. त्या दोन संशयितांचं नाव एफआयआरमध्ये न टाकल्यास प्रकरण गंभीर होईल. कोर्टसुद्धा तुमच्या बाजूने नाही. म्हात्रेंचं तुम्ही बघितलं. गणपतीपासूनच प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येची प्लॅनिंग झाली होती. तुमच्या पुढे एकच मार्ग आहे. मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us