धमकी, अ‍ॅडव्हान्स आणि जादूटोणा, संजय राऊत यांची ‘रोखठोक’ मुलाखत, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून, शिंदे गटानंच सुरतमध्ये अ‍ॅडव्हान्स घेतला. आणि गुवाहाटीत जादूटोणा केल्याचा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलाय.

धमकी, अ‍ॅडव्हान्स आणि जादूटोणा, संजय राऊत यांची रोखठोक मुलाखत, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Jan 31, 2023 | 11:06 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) धमकीमुळं आमदार गेले असा दावा शिंदे गटानं केला. त्यावरुन राऊतांनी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून, शिंदे गटानंच सुरतमध्ये अ‍ॅडव्हान्स घेतला. आणि गुवाहाटीत जादूटोणा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. निवडणूक आयोगात (Election Commission) लिखीत युक्तिवादात, संजय राऊतांच्या धमकीमुळंच आमदार गेले असा गंभीर आरोप करण्यात आला. त्या आरोपाला संजय राऊतांनी tv9च्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलंय. जिवंत प्रेतं परत येतील म्हणणं, हा मराठी वाक्यप्रचार आहे. पण धमकी समजत असाल तरी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांची विधानं आणि त्यांच्या वागणुकीमुळंच आमदार निघून गेले असं शिंदे गटाचे आमदार म्हणतायत. खोक्यांचा आरोप करतानाच, राऊतांनी आणखी एक सनसनाटी आरोप केलाय. शिंदे गटानं सुरतला अॅडव्हास घेतला आणि नंतर गुवाहाटीला जावून जादूटोणा केला, असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय.

TV9 च्या मुलाखतीतून संजय राऊतांनी शिंदे गटाला आव्हानही दिलंय. शिवसेनेवर दावा करण्यापेक्षा स्वत:चा गट निर्माण करुन जिंकून दाखवा असं संजय राऊत म्हणालेत. तसंच लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही, असा दावा करताच, खासदार श्रीकांत शिंदेंनाही आव्हान दिलंय.

प्रकाश आंबेडकरांच्या नव्या युतीवरही राऊतांनी भाष्य केलं. आंबेडकर ब्रँड आहेत असं सांगतानाच, कोण संजय राऊत या आंबेडकरांच्या टीकेवरही राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय.

निवडणूक आयोगासमोर राऊतांच्या धमकीचा उल्लेख असो, धनुष्यबाणाची लढाई की मग प्रकाश आंबेडकर,संजय राऊत tv9च्या मुलाखतीत रोखठोक बोललेत.