आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!

| Updated on: Aug 29, 2021 | 8:17 PM

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी ही आघाडी बनवून 'महाविकास'ची सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील राजकीय गणिते कशी असणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!
आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!
Follow us on

मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध महापालिका, नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे, असे विधान करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणुकांतील राजकीय समिकरणाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या स्वबळाच्या भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते विक्रोळी येथील सूर्या नगरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. (Sanjay Raut says, not only Mumbai but Maharashtra should be able to win)

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी ही आघाडी बनवून ‘महाविकास’ची सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील राजकीय गणिते कशी असणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान संजय राऊतांनी आज स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणुकांच्या बाबतीत त्यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. त्यांच्या विधानामुळे शिवसेना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

बाळासाहेबांच्या मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकवेन!

संजय राऊतांनी स्वबळाचा नारा देतानाच मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आणणार असल्याचाही निर्धार व्यक्त केला. या वेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून शिवसेनेच्या विजयासाठी प्रतिज्ञाच घेतली. मी शिवसैनिक सगळीकडे प्रचार करत असतो. मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याकडे नको. बाळासाहेबांच्या मुंबईवर शिवसेनेचा फगवा फडकवेन, ही प्रतिज्ञा घेवून प्रत्येकानं काम करायला पाहिजे, असे आवाहन करीत त्यांनी शिवसैनिकांना विजयासाठी कामाला लागण्याचे सूचित केले.

मुंबई महापालिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष

मुंबई महापालिकेवर सध्या शिवसेनेचीच सत्ता आहे. महापालिकेवर अनेक वर्षे भगवा फडकत असून विजयाची तीच परंपरा कायम राखण्याचा शिवसेनेचा दृढनिश्चय आहे. मात्र शिवसेनेची महापालिकेवरील विजयाची परंपरा खंडित करण्यासाठी विरोधी पक्षांनीही कामाला सुरुवात केली आहे. भाजप आपल्या परीने रणनिती आखू लागली आहे. इतरही राजकीय पक्ष स्वबळावर महापालिकेत आपला दबदबा राखण्यासाठी तयारी करू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईसारख्या देशातील श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे स्वप्न बाळगले आहे.

खोटेनाटे आरोप केले तरी डगमगणार नाही

कितीही चिखलफेक केली तरी आम्ही डगमगणार नाही, असं राऊत यांनी ठणकाऊन सांगितलंय. “असे कितीही तुम्ही कागद पाठवा काही हरकत नाही. तुम्ही करत राहा आम्ही लढत राहू. महाराष्ट्र आणि शिवसेनेची लढण्याची परंपरा आहे. अशा कितीही नोटिसा पाठवल्या, चिखलफेक केली, खोटेनाटे आरोप केले तरी आम्ही डगमगणार नाही, हे लिहून घ्या,” असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut says, not only Mumbai but Maharashtra should be able to win)

इतर बातम्या

माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा

काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान