तुम्ही साले… कसले XXXX बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? संजय राऊत यांची जीभ घसरली

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून संजय राऊत यांनी शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. "कसले बाळासाहेबांचे वारसदार?" असा सवाल करत त्यांनी शिंदे गटाला लेडी डॉनला पक्षातून हाकलण्याची मागणी केली. एसआयटी तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राऊत यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

तुम्ही साले... कसले XXXX बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? संजय राऊत यांची जीभ घसरली
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 11:15 AM

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवलाो. राऊत यांनी शिंदे गटाला शिवीगाळही केली. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणता. इकडे एका तरुण कार्यकर्त्याचा खून झाला. त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. तरीही तुम्ही ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना पक्षातून काढत नाहीत. तुम्ही साले, कसले XXXX बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

लेडी डॉन आणि तिच्या नवऱ्याची पक्षातून हकालपट्टी करा. हे नैतिक बळ तुमच्यात असलं पाहिजे. ही क्लिप ऐकल्यावर बाळासाहेबांनी त्या लेडी डॉनला पक्षातून बाहेर काढलं असतं. बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार म्हणता. बाळासाहेबांचा फोटो लावता. उठता बसता बाळासाहेबांचे नाव घेता. तुम्ही साले, आमचा पक्ष आमचा पक्ष म्हणता. तुम्ही XXXX कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? तुम्ही खून करता एका तरुण कार्यकर्त्याचा? त्याचं कुटुंब रस्त्यावर आणता? बोला. राग व्यक्त करा. शिवी घाला. मी शिव्या घालतो तशा तुम्ही शिव्या घाला. शिंदे तुम्ही खून केला, हे लक्षात घ्या. हा खून पचणार नाही. हा खून आम्ही कोणत्याही परिस्थितीत पचवू देणार नाही. हे लेडी डॉनलाही माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

फडणवीस खात्री कशी देऊ शकतात?

राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून एसआयटी स्थापन केली. त्याबद्दल आभारी आहोत. एसआयटीने जर कोणत्याही दबावााखाली न येता पारदर्शक पद्धतीने तपास केला तरच त्याला अर्थ राहील. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश केला असेल तर तपास निष्पक्ष कसा होणार? वर्षानुवर्षे हे अधिकारी कुणाच्या तरी मेहरबानीने एकाच जागी आहेत. ते कुणाचे तरी एजंट म्हणून काम करत आहेत. उच्च पदावर आहेत. एक एक अधिकारी 12-12 वर्ष एकाच पदावर आहे. तुमच्या गटाचे कार्यकर्ते म्हणून सेवेत रूजू आहेत. अशा अधिकाऱ्यांकडून पूर्णेकर यांच्या खूनाचा तपास योग्य दिशेने होईल याची खात्री फडणवीस कसे देऊ शकतात? असा सवाल राऊत यांनी केला.

या बाईला अटक करा

पूर्णेकर यांची हत्या राजकीय आहे. मी काल लेडी डॉनची क्लिप सोशल मीडियावर टाकली. ती कोणत्या भाषेत धमक्या देते ते ऐका. घरात गुंड घुसवण्याची धमकी देते. माझ्या नादाला लागाल तर सीपीला सांगून मागे लागेल असं म्हणते. तेव्हाचे सीपी आजही आहेत. पूर्णेकरांच्या घरी गुंड पाठवेन आणि खत्म करेल, अशी धमकी ही लेडी डॉन देत आहे. सीपीला सांगण्याची धमकीही देत आहे. गृहखात्याचे अधिकार फडणवीस यांनी या लेडी डॉनला दिले का? आपल्या नावाचा वापर होतोय तरीही सीपी हे सहन कसे करतात? या बाईला अटक करून बेड्या घाला. सीपीच्या नावाने धमक्या देते हा पहिला गुन्हा आहे. हे दुसरं कोणी केलं असले तर एव्हाना त्यांना अटक केली असते, असंही ते म्हणाले.

कहाण्या सांगितल्या जातील

पूर्णेकरांच्या हत्येमागे षडयंत्र आहे. त्याचे सूत्रे धार मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे आहेत. एसआयटी आणि पोलिसांनी किती नवीन कहाण्या समोर आणल्या तरी त्यावर आमचा विश्वास बसणार नाही. आता नवीन नवीन स्टोरी सांगितल्या जातील. मुख्य सूत्रधार बाहेर आहेत. अशा प्रकरणात दुसऱ्या तिसऱ्या लेअरचे मारेकरी मुख्य सूत्रधाराचे नाव सांगत नाहीत. त्यांची मानसिकता तशी केलेली असते, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us