AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्याचे नेतृत्व करा… संजय राऊत यांचं गणेश नाईक यांना मोठं आवाहन; काय घडतंय?

संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना ठाण्यातील वाढत्या गुंडगिरीविरोधात नेतृत्वाची हाक दिली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राऊत यांनी ठाणे पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. अमित शाह यांच्यावरही हल्ला चढवत, त्यांनी महाराष्ट्रात माफिया राज्याला प्रोत्साहन दिल्याचे म्हटले.

ठाण्याचे नेतृत्व करा... संजय राऊत यांचं गणेश नाईक यांना मोठं आवाहन; काय घडतंय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 10:50 AM
Share

प्रदीप पूर्णेकर यांचा खून आम्ही पचवू देणार नाही. या खूनाच्या मुळाशी जाणार आहोत. आरोपींना अटक झालीच पाहिजे. केवळ आरोपीच नव्हे तर मुख्य सूत्रधारही पकडले गेले पाहिजे, असं सांगतानाच गणेश नाईक ठाण्यातील गुंडगिरीवर नेहमी बोलत असतात. आज एका राजकीय कार्यकर्त्याचा खून झालाय. गणेश नाईक गप्प का आहेत? त्यांनी पुढे आलं पाहिजे. ठाण्याचं नेतृत्त्व केलं पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी थेट गणेश नाईक यांनाच ठाण्याचं नेतृत्व करण्याचं आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. गणेश नाईक यांना आवाहन आहे. केवळ ठाण्यातील गुंडगिरीवर बोलू नका. ठाण्यात या. पूर्णेकरांच्या घरी जा. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहा. ठाण्याचं नेतृत्व करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. गणेश नाईक गुंडगिरीवर बोलतात. ठाण्यात एक खून पडल्यावर तुम्ही का गप्प का? गणेश नाईकच नव्हे तर संवेदना असलेल्या नागरिकांनी पुढे आले पाहिजे. आदित्य ठाकरे आणि मी पोलीस ठाण्यात गेलो नसतो तर मुख्य आरोपींची नावेही जबाबात आली नसती. ही परिस्थिती आहे. अशा पोलिसांकडून पारदर्शक तपासाची अपेक्षा काय करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हत्येला पोलीस जबाबदार

आम्ही पूर्णेकरांचा खून पचू देणार नाही. या हत्येची जबाबदारी ठाणे पोलिसांची आहे. पूर्णेकरांच्या हत्येला ठाणे पोलीस जबाबदार आहेत. पहिला आरोपी ठाणे पोलीस आहे. एकनाथ शिंदेंच्या जीवावर, पोलिसांच्या नावावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही लेडी डॉन महापालिका निवडणुकीत धमक्या देते. खतम करण्याची भाषा करते. पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकावते. पोलीस आयुक्तांचं नाव आलं तरी ते काही करत नाहीत. ते पालकमंत्र्यांचे नोकर आहेत का? मुख्यमंत्र्यांना समजत नाही? ठाण्याचे पोलीस खातं वेगळं आणि महाराष्ट्राचं पोलीस खातं वेगळं आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.

शाहांनी गुंड निर्माण केले

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अमित शाहांनी महाराष्ट्राचं माफिया राज्य केलं आहे. त्यांनी गुंडांना पक्षात घेतलं आहे. भाजप गुंडांचा पक्ष केला आहे. भ्रष्टाचाराचा पक्ष केला आहे. ठाण्यातील गुंडाराजला अमित शाह जबाबदार आहेत. पूर्णेकरांचे रक्ताने माखलेले कपडे शाहांच्या अंगावर फेकले पाहिजे. महाराष्ट्रातील नालायकपणाला अमित शाहा जबाबबदार आहेत. शाह यांनी सैतान निर्माण केले आहेत. कार्यकर्ते निर्माण झाले नाही. पूर्णेकरांचा खून हा सैतानशाहीतून झाला आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...