Prakash Amate Admit : जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सर, दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु

| Updated on: Jun 13, 2022 | 8:50 PM

आमटे कुटुंब गेली 48 वर्षे गडचिरोलीतील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासी लोकांसाठी कार्य करत आहे. हेमकलसातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांकडून लोकसेवा सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंनी वडील बाबा आमटे यांचे समाजकार्य पुढे नेण्यासाठी कार्य करायचे ठरवले.

Prakash Amate Admit : जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सर, दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु
जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amate) यांना ब्लड कँसर (Blood Cancer)चे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा हेअरी सेल ल्युकेमीया (Hairy cell leukemia) ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला आहे. यामुळे त्यांना खूप ताप आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. न्यूमोनियाचा असर कमी झाला अन् शारिरीक ताकद वाढली की त्यांच्या कँसरचे उपचार सुरु करणार असल्याची माहिती कळते. त्यांच्या विविध तपासण्याही सुरु आहेत. दरम्यान, कुणीही फोन करुन डिस्टर्ब न करण्याची विनंती आमटे कुटुंबीयांनी केली आहे.

काय आहे हेअरी सेल ल्युकोमीया ?

हेअरी सेल ल्युकेमीया हा रक्ताचा दुर्मिळ कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती करते. अतिरिक्त निर्मितीमुळे या पांढऱ्या पेशी तारक ऐवजी मारक ठरतात. हा कर्करोग झालेल्या रुग्णांना सतत अशक्तपणा जाणवतो. तसेच वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, अति घाम येणे, दम लागणे, हाडांचे दुखणे, त्वचेवर लाल ठिपके येणे असे त्रास जाणवतात.

हे सुद्धा वाचा

लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांचे अतुलनीय कार्य

आमटे कुटुंब गेली 48 वर्षे गडचिरोलीतील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात आदिवासी लोकांसाठी कार्य करत आहे. हेमकलसातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांकडून लोकसेवा सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंनी वडील बाबा आमटे यांचे समाजकार्य पुढे नेण्यासाठी कार्य करायचे ठरवले. यातूनच लोकबिरादरी प्रकल्प सुरु झाला. आदिवासींच्या आरोग्यासाठी मोलाचे कार्य सुरु केले. प्रकाश आमटे यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.