Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं

हिंदुत्वावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना भवन आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाला शिवसेनेचा होणार विरोध यावरूनही जोरदार टीका सुरू आहे. आता मनसेने पुन्हा शिवसेनेवर यावरून जोरदार निशाणा साधला आहे. शालीनी ठाकरे यांनी सूचक ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

Shalini Thackeray : थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं! शालीनी ठाकरे यांनी पुन्हा सेनेला डिवचलं
शालीनी ठाकरे यांची सेनेवर खोचक टीका
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2022 | 8:14 PM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वावरून (Hindutva) आणि हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) भाजप आणि मनसे शिवसेनाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांची अटकही याच हनुमान चालीसा पठणाच्या अट्टाहासावरून झाली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरूनही मोठा वाद सुरू आहे. अशात भाजप नेत्यांनी शिवसेना आणि सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. गेल्या गुढी पाडव्यापासून राज्यात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मनसेने (Raj Thackeray) हाती घेतल्याने त्यावरूही बराच वाद सुरू आहे. अशात हिंदुत्वावरून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना भवन आणि मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाला शिवसेनेचा होणार विरोध यावरूनही जोरदार टीका सुरू आहे. आता मनसेने पुन्हा शिवसेनेवर यावरून जोरदार निशाणा साधला आहे. शालीनी ठाकरे यांनी सूचक ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

शिवसेनेला जोरदार टोलेबााजी

शालीनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दोन दिवसांच्या कलानागर मधील नाट्य प्रयोगानंतर मातोश्री वरील कार्यकर्त्यांच्या मनातील भावना…….थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं….!!! अशा आशयांचे ट्विट त्यांच्याकरून करण्यात आले आहे. त्यामुळे यावरूनही जोरदार आता वाद रंगण्याची शक्यता आहे. शालीनी ठाकरे यांच्या या ट्विटला शिवसेनाही तसाच पलटवार करत उत्तर देण्याची शक्यता आहे.

शालीनी ठाकरे यांचं ट्विट

हिंदुत्वावरून सेनेवर टीकेची झोड

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि मनसेकडून हिंदुत्वावरून शिवसेनवर सतत हल्लाबोल सुरू आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. अशी सतत टीका होत आहे. त्याला शिवसेनाही वेळोवेळी जोरदार प्रत्युत्तर देत आहे. मात्र राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेनंतर हा वाद आता आणखी वाढला आहे. त्यातच राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. हे दोन्ही दौरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

CM Uddhav Thackeray : आजी म्हणाल्या, साहेब, घाबरू नका मुंबईत शिवसेनाच येणार; उद्धव ठाकरे म्हणाले…

Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांसमोरही आजी म्हणाल्या झुकेगा नहीं, तर मुख्यमंत्री म्हणतात असे शिवसैनिक बाळासाहेबांचा आशीर्वाद…

PM Narendra Modi : लतादीदींच्या नावाने मिळणारा पुरस्कार जनतेला अर्पण करतो; मोदींनी जागवल्या दीदींच्या आठवणी