मुख्यमंत्री आणि रिक्षाचालकांच्या बैठकीत काय ठरलं?

रिक्षाचालकांच्या विविध मुद्द्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिक्षाचालक युनियनचे नेते शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत येत्या 7 ते 8 दिवसात रिक्षाचालकांच्या मागण्याबाबत निर्णय घ्यायला सुरुवात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मुख्यमंत्री आणि रिक्षाचालकांच्या बैठकीत काय ठरलं?
| Updated on: Jul 09, 2019 | 5:01 PM

मुंबई :  रिक्षाचालकांच्या विविध मुद्द्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिक्षाचालक युनियनचे नेते शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत येत्या 7 ते 8 दिवसात रिक्षाचालकांच्या मागण्याबाबत निर्णय घ्यायला सुरुवात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन करण्याची गरज नाही, अशी भूमिका शशांक राव यांनी घेतली. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीला परिवहनमंत्री दिवाकर रावते अनुपस्थित होते. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंऐवजी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते.

बैठकीत काय झाले निर्णय?

  • कल्याणकारी महामंडळाचं गठन करण्याबाबत येत्या आठ दिवसात निर्णय जाहीर करणार
  • या महामंडळाच्या कामकाजाचं स्वरूप ठरवण्यासाठी एका समितीची नेमणूक करणार. ही समिती शासनाला आठवड्याभरात अहवाल सादर करणार
  • अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमणार. याबाबत आठ दिवसात शासन आदेश जारी केले जातील.
  • दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले मुक्त परवाने रद्द करण्याबाबत निर्णय घेऊन जेव्हा जिथे गरज असेल तिथेच त्यांना परवानगी दिली जाईल.

रिक्षाचालकांच्या मागण्या काय?

परिवहन खात्याअंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावे, रिक्षाच्या विमाचे वाढलेले दर कमी करावे, भाडेवाढ, अशा विविध मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला होता. या संपात 20 लाख रिक्षाचालक संपात सहभागी होतील असं सांगण्यात येत होतं.

संबंधित बातम्या  

9 जुलैपासून रिक्षा चालक बेमुदत संपावर

मुंबईत रिक्षा चालकांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांसोबत रिक्षा युनियनची आज बैठक