AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार; संजय राऊत यांचा सूचक इशारा

प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on prabhakar sail video)

नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार; संजय राऊत यांचा सूचक इशारा
शिवसेना नेते संजय राऊत
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 10:53 AM
Share

मुंबई: प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

धागेदोरे दिल्लीपर्यंत

याप्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.

करा ना सीबीआय चौकशी, मी दहा व्हिडीओ देतो

भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

ते भाजपच सांगेल

केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

साईलच्या धाडसाचं कौतुक

साईल हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा केली पाहिजे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

(shiv sena leader sanjay raut reaction on prabhakar sail video)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती