AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे. या दाहक निष्कर्षाचे काय?, असा प्रश्न आज सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल
CORONA
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 9:43 AM
Share

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे. या दाहक निष्कर्षाचे काय?, असा प्रश्न आज सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. लसीकरण वाढले आणि सरासरी आयुष्य घटले हे चित्र काही बरे नाही. 100 कोटी लसीकरणाच्या गाजावाजात घटलेल्या आयुष्याचा आक्रोश विसरुन जाऊ नये, असं यात म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रांवर अत्यंत वाईट परिणाम

कोरोना महामारीचे दुष्परिणाम संपूर्ण जगच भोगत आहे. मागील दीड वर्षापासून या विषाणूने आपल्या देशातही हाहाकार माजविला आहे. त्यातून वेळोवेळी कराव्या लागलेल्या लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रांवर अत्यंत वाईट परिणाम झाले आहेत. मात्र, कोरोनाचा आणखी एक भयंकर आणि दूरगामी दुष्परिणाम आता समोर आला आहे. या विषाणूने हिंदुस्थानी नागरिकांचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी कमी केले आहे. मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा भयंकर निष्कर्ष समोर आला आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांना अनेक प्रकारचे ‘पोस्ट कोविड’ दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. ज्यांना आधीच काही आजार आहेत अशा कोरोना रुग्णांना तर हा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत आहे. त्यात आता कोरोनामुळे हिंदुस्थानी नागरिकांचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष निश्चितच धक्कादायक आहे. तीनच दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाने देशात 100 कोटींचा टप्पा ओलांडल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. नेहमीच्या पद्धतीने सरकारने हा ‘विक्रम’ विविध पातळ्यावर साजराही केला. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी खास संवाद साधला आणि 100 कोटी लसीकरणाचे यश हे देशाच्या 130 कोटी जनतेचे आहे असे ते म्हणाले. देशभरातील सर्व संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अपार मेहनत घेतली आहे.

हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटले

अर्थात 100 कोटी लसींचा टप्पा कोरोना लढाईतील एक भाग झाला. इतरही अनेक आव्हाने ही लढाई जिंकण्यासाठी पेलायची आहेत. कारण कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांवर वाईट परिणाम झाले आहेत. मात्र हिंदुस्थानी माणसाचे आयुष्य दोन वर्षांनी घटल्याचा निष्कर्ष सगळ्यात धक्कादायक आहे. कोरोनामुळे ज्या दुर्दैवी जिवांचा मृत्यू झाला, ने तर काही परत येऊ शकणार नाहीत. ज्यांच्या आरोग्यावर काही परिणाम झाले आहेत, ते औषधोपचार आणि इतर उपायांनी सुधारता येतील.

लॉकडाऊन करावे लागल्याने देशाचे आणि व्यक्तिगत पातळीवर लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लाखो रोजगार बुडाले, औद्योगिक तोटा झाला. हे नुकसानही कालांतराने भरुन निघू शकेल. देशाचा आधीच पसरलेला आर्थिक विकास कोरोनाने पुरता ठप्प केला. हे गाडे रुळावर यायला वेळ लागेल, पण ते येईल अशी आशा करता येईल. कोरोनाच्या सामाजिक, मानसिक परिणामांवरदेखील काळ हेच औषध ठरेल. मात्र देशातील नागरिकांचे घटलेले सरासरी आयुर्मान पुन्हा कसे आणि कधी पूर्ववत होणार? ज्या संस्थेने हा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला, त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार कोरोनापूर्वी आपले सरासरी आयुर्मान 69.5 वर्षे इतके होते. आता ते 67.5 वर्षे झाले आहे. महिलांचे आयुष्यही 72 वर्षावरून 69.8 वर्ष एवढे खाली आले आहे.

थोडक्यात, 2010 मध्ये आपले जे आयुर्मान होते, त्याच ठिकाणी आपण आलो आहोत. म्हणजे देशवासीयांचे सरासरी आयुष्य वाढविण्यासाठी मागील दशकात घेतलेली मेहनत कोरोनाच्या लाटांनी साफ पाण्यात गेली आहे. आता ही घटलेले सरासरी आयुर्मान पुन्हा पूर्वपदावर आणणे आणि नंतर ते वाढविणे हे एक मोठेच आव्हान हिंदुस्थानसमोर असणार आहे. हे उद्दिष्ट पुढील किती वर्षांत साध्य होते ते कोणीच सांगू शकणार नाही. आपल्या देशात कोरोनाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोकाही आहेच, चीन, रशिया आणि अन्य काही देशांत कोरोमाने आता पुन्हा धुमाकूळ घातला आहे. म्हणजे कोरोनाची टांगती तलवार आपल्याही डोक्यावर आणखी काही काळ राहणारच आहे.

लसीकरण हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे हे खरेच, पण कोरोनाने घटविलेल्या सरासरी आयुर्मानाचाही विचार करावाच लागेल, कोरोना लसीकरणाची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ जरूर व्हावीत, पण त्याच कोरोनाने हिंदुस्थानी माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले आहे, या दाहक निष्कषचि काय? लसीकरण वाढले आणि सरासरी आयुष्य घटले हे चित्र काही बरे नाही. 100 कोटी लसीकरणाच्या गाजावाजात घटलेल्या आयुष्याचा आक्रोश विसरुन जाऊ नये इतकेच!

संबंधित बातम्या :

“अखंड राष्ट्र करायचं तर स्वागत पण फाळणी करुन तुटलेल्या पाकिस्तानातील 11 कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावर मोदींनी बोलावं”

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती!”

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.