मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, ‘या’ नेत्यांकडून नियोजित कार्यक्रम रद्द

| Updated on: Feb 22, 2021 | 12:10 AM

उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर अनेक मंत्र्यांनी नियोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. (Minister Cancelled their Programme)

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, या नेत्यांकडून नियोजित कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजपासून राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालत असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर महाविकासआघाडीतील काही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर अनेक मंत्र्यांनी नियोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. (Some Minister Cancelled their Programme after cm uddhav thackeray appeal)

सुप्रिया सुळेंकडून नियोजित कार्यक्रम रद्द 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझे 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. 22 फेब्रुवारीला मी पुणे येथील कार्यालयात भेटींसाठी उपलब्ध राहणार होते. परंतु या भेटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत,” असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

“कोरोनाच्या संकटाचा दृढपणे मुकाबला करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ‘मी जबाबदार’ नागरिक आहे, त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी मी आवश्यक ती काळजी घेईन हा निश्चय प्रत्येकाने करावा,” अशी विनंतीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

उदय सामंतांकडून आवाहनाला प्रतिसाद

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्या, दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

नितीन राऊतांचे सामाजिक भान 

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मी माझ्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन रद्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याला संबोधित करताना आमच्या सामाजिक भावनेचे कौतुक केले. तसेच माझ्या मुलाला आशीर्वाद दिला. मुख्यमंत्र्यांचे याबद्दल मी आभार मानतो, असे ट्वीट मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?  

“कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, यात्रा, आंदोलनं, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. जिथं गरज असेल तिथं बंधनं घालणं किंवा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या सूचना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. अमरावती, यवतमाळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्यानंतर तिथं लॉकडाऊन करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी अचानक घोषणा न करता जनतेला 24 तास द्यावेत.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? 8 दिवसांचा अल्टिमेटम

हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी रात्री सात वाजता संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा सवाल केला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत. (Some Minister Cancelled their Programme after cm uddhav thackeray appeal)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown Updates : सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबईतील ऑफिसचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांची सूचना कंपन्या पाळणार?