AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाचखोर पोलिसांना थेट बडतर्फ, मुंबई पोलीस आयुक्तांची धडक कारवाई

मुंबई : मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जर कुठल्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आले, तर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्त यांनी काळाचौकी येथील एका पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि पोलीस शिपाई अविनाश अंधारे यांना सेवेतून बडतर्फ […]

लाचखोर पोलिसांना थेट बडतर्फ, मुंबई पोलीस आयुक्तांची धडक कारवाई
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

मुंबई : मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जर कुठल्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आले, तर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मुंबई पोलीस आयुक्त यांनी काळाचौकी येथील एका पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव आणि पोलीस शिपाई अविनाश अंधारे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

गेल्या महिन्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांनी काळाचौकी परिसरात एका व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरर्णी काळाचौकी पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या दोन्ही अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली.

मुंबई पोलीस दलातल्या प्रत्येक परिमंडळमध्ये प्रतिमा मलीन असणाऱ्या बऱ्याच अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत अनेक पोलिसांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस दलातील हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी आयुक्तांनी महत्वपूर्ण पाऊले उचलली असल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओ : देशभरात पेट्रोलपंप चालकांची पुलवामा शहीदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली

भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.