AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सुप्रिया सुळेंचे भावी व्याही, या महत्त्वाच्या पदावर वर्णी, या युवा चेहर्‍यांना मोठी संधी

BJP State Executive Body: भाजपची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भावी व्याहींचीही वर्णी लागली आहे. तर काही नवीन चेहर्‍यांना सुद्धा मोठी संधी मिळाली आहे. तर उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सुप्रिया सुळेंचे भावी व्याही, या महत्त्वाच्या पदावर वर्णी, या युवा चेहर्‍यांना मोठी संधी
अरुण लखानी, सुप्रिया सुळेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 24, 2026 | 12:39 PM
Share

Arun Lakhani as a Co Treasurer: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची सुद्धा वर्णी लागली आहे. लखानी हे प्रदेश कार्यकारिणीत सह कोषाध्यक्ष असतील. तर या बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना सुद्धा संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. तर या घडामोडींवर उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी चिमटा घेतला आहे.

व्याही अरूण लखानी सह कोषाध्यक्ष

भाजप प्रदेश कार्यकारिणीत खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांची वर्णी लागली आहे. त्यांना सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे लग्न सारंग अरुण लखानी(Sarang Arun Lakhani) यांच्यासोबत निश्चित झाले आहे. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूण लखानी हे आहेत. ते मूळचे नागपूरचे आहेत. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी PPP प्रकल्पांसह इतर अनेक उद्योगात हा समूह आघाडीवर आहे.

प्रदेश पदाधिकारी निवडीतून दुसर्‍या फळीची बांधणी

भाजपकडून बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून नव्या टीमची घोषणा करण्यात आली. नवनाथ बन, निरंजन डावखरे, कृष्णराज महाडीक या युवा चेहऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी देण्यात आली. नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पद, निरंजन डावखरे सरचिटणीस तर कृष्णराज महाडीक यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच पक्षातही युवकांना संधी देण्यात भाजपचा पुढाकार दिसून येत आहे.

तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकार्‍यांची नेमणूक करावी असे ठरले होते. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

केशव उपाध्ये यांच्यावरून अंधारेंचा भाजपवर निशाणा

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत केशव उपाध्ये यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर त्यावरुन उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यानुसार, भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली. उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी सुरू झाली आहे हे बघून खंत वाटली. भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्ता स्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंज्या टाकण्याचे काम भाजपाने दिले आहे. ही फडणवीसांची भाजपा आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...