वो आझादी की सुबह आने वाली है, सुषमा अंधारेंनी विश्वासच व्यक्त केला…

| Updated on: Nov 15, 2022 | 12:42 AM

आम्ही लढणार आहोत.. लढताना आमच्या सुसंस्कृत संयमी नेतृत्त्वाला शोभेल असं लढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वो आझादी की सुबह आने वाली है, सुषमा अंधारेंनी विश्वासच व्यक्त केला...
Follow us on

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या विरोधकांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणामार्फत चौकशीचा ससेमिरा लावल्याने भाजपवर प्रचंड टीका केली जात आहे. त्याप्रकरणीच ठाकरे गटाच्या उपगटनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपव जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्या म्हणाल्या की, माझ्याकडे काहीच नाहीये त्यामुळे मला ईडीची भीती नाहीये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, एक लेकरू आहे ते शिवसेनेला दान केलं आहे असं म्हणत त्यांनी टीका आणि चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री जर तीन महिन्यात माझ्या मागे हात धुवून लागले असतील, तर लक्षात ठेवा.. बाजी पलटने वाली है असंही म्हटले आहे. सुषमा अंधारेंच्या सभांआधी त्यांना अडवण्यात आल्यानेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

तर ज्या नेत्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येतात. त्याप्रकरणावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्या देवेंद्र फडणवीस यांना उद्देश्यून म्हणाल्या की, खबऱ्यांनो.. मी एकटी फिरते.. मला वाय प्लस सुरक्षा लागत नाही. ज्यांना लोकांची भीती वाटते ते सुरक्षा घेऊन फिरतात असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या सुरक्षा काढून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळेही त्यांनी टीका केली आहे. आमच्या नेत्यांची सुरक्षा काढणं हे कुटील डाव कळतात देवेंद्रभाऊ असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि शिंदे-ठाकरे गट न्यायालयात गेल्याने आम्ही लढणार आहोत. त्याबरोबरच शिवसेनेतील अनेक नेते सोडून गेल्यानेही त्यानी तो शब्द दिला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही लढणार आहोत.. लढताना आमच्या सुसंस्कृत संयमी नेतृत्त्वाला शोभेल असं लढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच विश्वास बाळगू की वो आझादी की सुबह आने वाली है असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.