भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठी दुर्घटना घडली होती, भुलेश्वरच्या राजाच्या अगमनावेळी ही घटना घडली. गणपीची मूर्ती कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता, आता त्याचं कारण समोर आलं आहे.

भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा
Bhuleshwar raja
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 9:38 AM

काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठी दुर्घटना घडली होती, भुलेश्वरच्या राजाच्या अगमनावेळी ही घटना घडली. गणपीची मूर्ती कोसळली, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले होते. मंडपापासून मूर्तीचं अंतर अवघं 50 ते 60 मीटर एवढंच राहिलं होतं. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. 22 फूट उंची अशी ही भव्य भुलेश्वर राजाची मूर्ती होती. परंतु ही मूर्ती मंडळात आणत असताना हा अपघात घडला. दरम्यान ही गणपतीची मूर्ती नेमकी कशी कोसळली याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एलटी मार्ग पोलिसांकडून शिल्पकाराचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेत मंडळाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी दोन अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवले असून, स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह सुमारे १५ ते २० लोकांची चौकशी करण्यात आली आहे.  रविवारी रात्री मिरवणुकीदरम्यान भुलेश्वरचा राजा गणेश मूर्ती दुर्घटनेत मंडळाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी दोन अपघाती मृत्यू अहवाल (ADR)  नोंदवला आहे.

तपासाचा एक भाग म्हणून, पोलिसांनी भुलेश्वरचा राजा मूर्ती घडवणारे शिल्पकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे. सूत्रांनुसार, पोलिसांनी आतापर्यंत मंडळ पदाधिकारी, स्वयंसेवक आणि आगमन सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींसह सुमारे १५ ते २० लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनुसार, देसाई यांची बकरी अड्डा येथे एक तात्पुरत्या स्वरुपाची कार्यशाळा आहे, जिथे त्यांनी मंडळाने दिलेल्या तपशीलानुसार मूर्ती तयार केली होती.  चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, देसाई यांनी २२ फूट उंच गणेश मूर्ती बनवण्याचे काम पहिल्यांदाच हाती घेतले होते, गेल्या वर्षी त्यांनी कामाठीपुरा येथील एका मंडळासाठी १९ फूट उंच गणेश मूर्ती बनवली होती.

दरम्यान  अनिकेत देसाई यांच्या जबाबात महत्वाची माहिती समोर आली आहे.  आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच १५० मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते,  मूर्ती १५० मीटर अंतरावरून पुन्हा कारखान्यात आणण्यात आली आणि वेल्डिंग करण्यात आले होते, त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेली. अशी माहिती मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी आपल्या जबाबत दिली आहे. मूर्तीचे वेल्डिंग तुटल्यामुळे तोल गेल्याने मूर्ती कोसळल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

 

Follow Us