नेरळ – माथेरान मिनी ट्रेन या तारखेपासून पुन्हा धावणार, बच्चे कंपनीची दिवाळीत सुटीत धमाल

पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सुरक्षेसाठी नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या काळात माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असते.

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन  या तारखेपासून पुन्हा धावणार, बच्चे कंपनीची दिवाळीत सुटीत धमाल
Neral–Matheran mini train will resume operations
| Updated on: Oct 28, 2026 | 9:30 PM

माथेरान हील स्टेशनवरील नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन आता ३० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पावसाळ्यातील जून ते ऑक्टोबर महिन्यात नेरळ ते माथेरान ही थेट सेवा बंद ठेवली जाते. मात्र, या काळात माथेरान ते अमन लॉजची शटल सेवा सुरु ठेवण्यात येते. आता पुन्हा नेरळ ते थेट माथेरान अशी घाटमाथ्यापर्यंत मिनी ट्रेनची सेवा बहाल होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनीला मिनी ट्रेनचा पुन्हा आनंद लुटता येणार आहे. तसेच स्थानिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी देखील ही ट्रेन महत्वाची ठरणार आहे.

रेल्वेवरील नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा सुरू होत आहे. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सुरक्षेसाठी नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या काळात माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असते.

Loading...

नेरळ – माथेरान आणि अमन लॉज – माथेरान दरम्यानच्या रेल्वे फेऱ्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

(अ) नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा:–

नेरळ – माथेरान डाऊन ट्रेन

१. नेरळ (दररोज) सकाळी ०८.५० वा.आणि माथेरान सकाळी ११.३० वा.

२. नेरळ (दररोज) सकाळी १०.२५ वा. आणि माथेरान दुपारी ०१.०५ वा.

माथेरान – नेरळ अप ट्रेन

१. माथेरान (दररोज) दुपारी २.४५ वा. आणि नेरळ सायं. ५.३० वा.

२. माथेरान (दररोज) सायं.४.०० वा.आणि नेरळ सायं. ६.४० वा.

• डब्यांची रचना – एकूण ६ डबे असतील, ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, १ विस्टाडोम डबा आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.

(ब ) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा

अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दररोज)

१. अमन लॉज स. ०८.४५ वा.आणि माथेरान स.०९.०३ वा.

२. अमन लॉज स. ०९.३५ वा.आणि माथेरान स. ०९.५३ वा.

३. अमन लॉज दु. १२.०० वा.आणि माथेरान दु. १२.१८ वा.

४. अमन लॉज दु. २.२५ वा.आणि माथेरान दु. २.४३ वा.

५. अमन लॉज दु. ३.४० वा.आणि माथेरान सायं. ३.५८ वा.

६. अमन लॉज सायं. ५.४५ वा.आणि माथेरान सायं.६.०३ वा.

शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील:

७. विशेष-१: अमन लॉज येथून स.१०.३० वाजता सुटेल, माथेरान येथे स. १०.४८ वा. पोहोचेल.

८. विशेष-३: अमन लॉज येथून दु. १.३५ वाजता सुटेल, माथेरान येथे दु.१.५३ वा. पोहोचेल.

माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दररोज)

१. माथेरान स. ०८.२० वा. आणि अमन लॉज स. ०८.३८ वा.
२. माथेरान स. ०९.१० वा. आणि अमन लॉज स.०९.२८ वा.
३. माथेरान स. ११.३५ वा. आणि अमन लॉज स. ११.५३ वा.
४. माथेरान दु.२.०० वा. आणि अमन लॉज दु.२.१८ वा.
५. माथेरान दु. ३.१५ वा. आणि अमन लॉज दु.३.३३ वा.

६. माथेरान सायं.५.२० वा. आणि अमन लॉज सायं.५.३८ वा.

शनिवार/रविवार रोजी खालीलप्रमाणे अतिरिक्त विशेष सेवा उपलब्ध असतील:
७. विशेष-२: माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल, अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल.
८. विशेष-४: माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल, अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us