… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Apr 10, 2021 | 5:46 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)

... तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी दोनच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होताच राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचं सादरीकरण केलं. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल तर सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षाला आवाहन

लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं आवाहनच सर्व पक्षांना केलं आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कळत नकळत होणारा प्रसार घातक

कोरोनाचा कळत नकळत होणारा प्रसार अत्यंत घातक आहे. तरुण वर्ग कोरोनामुळे अधिक बाधित होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे 25 वयापासूनच्या पुढील तरुणांना लस देण्याची परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra all party meeting Live : यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये, लॉकडाऊनची वेळ आली आहे- मुख्यमंत्री

पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Aurangabad | औरंगाबादेत मोठ्या बाजारपेठा कडकडीत बंद, लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

(there is no alternative except lockdown, cm uddhav thackeray tells all party leader)