Uddhav Thackeray: होय, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, दसरा मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, सरकारला मोठा इशारा
Uddhav Thackeray on Regime: उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. लोकशाहीत विरोधाचा आणि मतदानाचा हक्क हिरावणाऱ्या सरकारला हटवाच असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या वक्तव्याचे देशभरात मोठे पडसाद उमटले आहेत.

Uddhav Thackeray on Regime: निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या जवळपास महिनाभरापासून देशभरात विरोधाची लाट आहे. त्यातच काँग्रेसनंतर दिल्लीतील आंदोलनाची बाजू कॉकरोच जनता पार्टीने खांद्यावर पेलली आहे. पण आंदोलकांची मुस्कटादाबी सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधी पक्ष आणि इतर संघटनांच्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी जी कारवाई केली. त्यावरून शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धवठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेची तडक भूमिका जाहीर केली. लोकशाहीत विरोधाचा आणि मतदानाचा हक्क हिरावणाऱ्या सरकारला हटवाच असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे देशातील राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्ता टाकलाच
” प्रशांत भूषण जे बोलले, रिजीम चेंज. हो, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, काय म्हणणं आहे तुमचं? जर तुम्ही आमच्याकडून निवडणुकीच्या माध्यमातून आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेत असाल, आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेत असाल, तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत.” असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय पत्रकार परिषदेकडून आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी सत्ताबदलासाठी एल्गार पुकारला. त्यांनी थेट पत्ता फेकला. त्यांच्या या वक्तव्याचे आज दिवसभरात पडसाद पाहायला मिळतीलच. पण सरकारला हादरे द्यायचे आहेत हे त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता जाहीर केले आहे, हे नक्की.
हाच खरा तटस्थपणा
“तटस्थ असण्याचा खरा अर्थ काय? पत्रकाराने सुद्धा अंपायरसारखं राहिलं पाहिजे. आपण क्रिकेट, फुटबॉलची मॅच बघतो. न्यायाच्या बाबतीत काळं आणि पांढरं स्पष्ट पाहिजे. जसा फुटबॉलचा रेफ्री हा संपूर्ण वेळ खेळाडूंबरोबर धावत असतो, पण कोणी चूक केली तर, तो खेळाडू कोण आहे हे न पाहता, तो त्याला यलो अथवा रेड कॉर्ड दाखवत असतो, हेच काम पत्रकारांचं आहे. कोणीही असेल. कितीही मोठा असेल. मेस्सी असो किंवा आणखी कोणी, पण येथे तू मेस करून ठेवलं आहेस, त्याबद्दल तुला रेड कार्ड, असं सांगता आलं पाहिजे, यालाच तटस्थपणा म्हणतात.” असे सूत्र त्यांनी या भाषणातून त्यांनी गुंफलं. पण त्याचवेळी सरकारला त्यांनी थेट आव्हान उभं केलं आहे. ते त्यांनी स्पष्ट शब्दातही मांडलं. होय, आम्हाला सत्ताबदल करायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी भरसभेत जाहीर केलं. त्यांनी दसरा मेळाव्यापूर्वीच राजकीय लड लावली. आता त्याचे आवाज दूरपर्यंत जातील.