AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Dasara Melava: आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची धडाडणार तोफ, शिंदे सेनेकडूनही शक्तीप्रदर्शन, मैदान कोण गाजवणार?

Uddhav Thackeray-Eknath Shinde Dasara Melava: आज विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी मुंबईत उद्धव सेना आणि शिंदे सेनेचा मेळावा होत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडतील. कोण मारणार आज बाजी? कोण गाजवणार मैदान?

Uddhav Thackeray Dasara Melava: आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची धडाडणार तोफ, शिंदे सेनेकडूनही शक्तीप्रदर्शन, मैदान कोण गाजवणार?
आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची धडाडणार तोफ, शिंदे सेनेकडूनही शक्तीप्रदर्शन, मैदान कोण गाजवणार?
| Updated on: Oct 20, 2026 | 6:51 AM
Share

Uddhav Thackeray-Eknath Shinde Dasara Melava Today: आज मंगळवारी उद्धव सेना आणि शिंदे सेनेचा मुंबईत दसरा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे यांचा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होईल. आज राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडतील. शिवसेना फुटीनंतर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे शक्तीप्रदर्शन करतात. बाळासाहेबांच्या वारशावर, विचारांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे. एक गट महाविकास आघाडीत तर दुसरा गट हा सत्तेत आहेत. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे SIR, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी सरकार यांच्याविरोधात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांविरोधातील वातावरणाविषयी एकनाथ शिंदे काय बोलतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही नेते विचारांचं सोनं वाटणार की एकमेकांवर तोफ डागणार याचीही उत्सुकता लागलेली आहे.

मेळाव्यापूर्वी टीझर आणि बॅनरवॉर

दरम्यान उद्धव सेनेने या दसरा मेळाव्यापूर्वी दोन ते तीन टीझर रीलीज केले आणि वातावरण निर्मिती केली. राजकीय वारसा आणि सध्याच्या राजकीय गोंधळावर उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता चाळवली गेली आहे. तर दुसरीकडे गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात. राज्यात तीव्र दुष्काळ असल्याने मुंबईत येऊ नका, तर दुष्काळग्रस्तांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा असे आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना अगोदरच केले आहे. यावेळी गर्दीचा उच्चांक कोण मोडेल यापेक्षा कोण मैदान गाजवणार याची उत्सुकता शिगेला आहे. तर मुंबईतील अनेक भागात बॅनरवॉरही रंगली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी बॅनर लावलेले आहे.

होय, आम्हाला सत्ता उलथवायची आहे

दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झंझावाती भाषण केले. त्यांनी शिवसेनेचा ताठ बाण दाखवून दिला. होय, आम्हाला सत्ता उलथवायची आहे, असा थेट संदेश त्यांनी दिला. त्याची राज्यातच नाही तर देशभरात मोठी चर्चा झाली. जे सरकार मत चोरी करून सत्तेत आलेले आहे, त्याची सत्ता उलथवायची आहे. रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत, असे सांगायला उद्धव ठाकरे यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार टोला हाणला. आजच्या भाषणात आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष