Kishori Pednekar : मराठी माणूस पेटून उठत नाही म्हणून..रेल्वे स्टेशनवरच्या भोजपुरी गाण्यांवरुन किशोरी पेडणेकर सरकारवर तुटून पडल्या

Kishori Pednekar : मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर काल भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. यावरुन राजकीय वातावरण तापत चाललं आहे. हा महाराष्ट्र आहे की बिहार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

Kishori Pednekar : मराठी माणूस पेटून उठत नाही म्हणून..रेल्वे स्टेशनवरच्या भोजपुरी गाण्यांवरुन किशोरी पेडणेकर सरकारवर तुटून पडल्या
Kishori Pednekar
| Updated on: Nov 12, 2026 | 10:59 AM

मुंबईत ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी हार्बर रेल्वे स्थानकांवर छटपूजेची भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करणाऱ्या स्पीकर्सवर भोजपूरी गाणी वाजवली जात होती. येत्या रविवारी छटपूजा आहे. यापूर्वी सुद्धा छटपूजेवरुन वाद झाले आहेत. अनेक प्रवाशांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून हा महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश-बिहार नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईत हार्बर मार्गावर वडाळा, नेरुळ यासह अजून काही रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. मुंबईत महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. “त्यांना विचारा बाळासाहेबांचे विचार कुठे ठेवलेत?. आज केंद्रातून सर्वांना परमिशन येतात. केंद्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि रेल्वे मंत्री यांच्या पलीकडे कोण देणार?” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्राला यूपी बिहार सारखं करायचय. यूपी, बिहार सुधारलं. मुल शिकायला लागली. दंगलखोर बदलायला लागले. तिकडचे मुख्यमंत्री चांगलं करत आहेत. इथले मुख्यमंत्री यूपी बिहार करायला लागले आहेत. संविधान बदलायचं ते हेच” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. “महाराष्ट्रात महाराष्ट्राची गाणी ऐकली पाहिजेत. बिहार, आसाम, युपी त्या ठिकाणच्या भाषेची गाणी त्या ठिकाणी ऐकली पाहिजेत. काय म्हणून आमच्या महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी लावली. मोठ्या आवाजात गाणी लावली. डेसिबल तिकडे नाही” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

Loading...

महाराष्ट्रात भोजपुरी गाणी का?

“सर्वांनी डेसिबल पाळायचं आणि या लोकांनी नाही पाळायचं. मराठी माणूस पेटून उठत नाही म्हणून या लोकांचे धाडस वाढत चालले आहे. आमच्या हुतात्म्यांनी महाराष्ट्र काढून आणला गुजरात मधून. ते लोक आता पुन्हा चारही बाजूने महाराष्ट्राच्या बॉर्डर एक करायचा आणि महाराष्ट्राला संपवून टाकायचा. संविधान बदलण्याची सुरुवात अशीच आहे. अनेक राज्यात अनेक प्रकारच्या भाषा आहेत. महाराष्ट्रात का भोजपुरी गाणी वाजवली जातायत” असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us