उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला, नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण?

उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला आहे. नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्हासनदीचं पाणी अतिशय गढूळ दिसतंय.

उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला, नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण?
| Edited By: | Updated on: Feb 17, 2023 | 4:09 PM

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातून (Ulhasnagar) वाहणाऱ्या वालधुनी नदीत आज दुपारच्या सुमारास कुणीतरी रासायनिक सांडपाणी सोडलं. त्यामुळे नदीचा रंग लाल झाला आहे. या प्रदूषित लाल पाण्याला (polluted water ) रसायनाचा उग्र दर्प येत आहे. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. उल्हासनगरच्या स्टेशन परिसर, काजल पेट्रोल पंप, शांतीनगर परिसरात नदीचं पाणी लाल झाल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदीत अशा प्रकारे वारंवार रासायनिक सांडपाणी सोडलं जातात. नदीत प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता केली जातेय.

प्रदूषित पाण्याचा उग्र दर्पाने नागरिक हैराण उल्हासनगरातून वाहणारी वालधुनी नदी प्रदूषणामुळे लाल झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या नदीत रासायनिक सांडपाणी सोडण्यात आलं आहे. त्याच्या उग्र दर्पामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

उल्हास नदीचा रंगच बदलला

उल्हासनगरच्या उल्हास नदीचा रंगच बदलला आहे. नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्हासनदीचं पाणी अतिशय गढूळ दिसतंय. हे पाणी गढूळ करणारे कोण याचा शोध घेणे आवश्यक आहे. नदीचे पाणी गढूळ झाले तर आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या पाण्यावर त्याचा परिणाम होतो. या गढूळ पाण्यामुळं अनेक आजार बळावण्याची शक्यता असते.

नदीचे पाणी गढूळ कुणी केले?

नदीच्या बाजूला काही कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी या नदीत सोडले जाते. त्यामुळं या नदीचे पाणी गढूळ होते. हे पाणी गढूळ का झालं. याला जबाबदार कोण आहेत, याची चौकशी होणे आवश्यक आहे. दोषींवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

या परिसरातील पाणी लाल

उल्हासनगरच्या स्टेशन परिसर, काजल पेट्रोल पंप, शांतीनगर परिसरात नदीचं पाणी लाल झालंय. याचा अर्थ यापूर्वी कुणीतीही पाण्यात रासायनिक सांडपाणी टाकले असल्याची शक्यता आहे. नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने आजूबाजूचे नागरिक हैराण झाले आहेत. नदीचा रंग गढूळ करण्याऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.