AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करत तिच्याच नवऱ्यासोबत थाटला संसार, आता अभिनेत्रीवर आलीये अत्यंत वाईट वेळ

Bollywood Actress Divorce: करावं तसं भरावं... अभिनेत्रीने मैत्रिणीचाच केला घात... मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार... लग्नाच्या 3 वर्षांनंतर अभिनेत्रीवर आलीये अत्यंत वाईट वेळ... जाणून व्हाल हैराण..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करत तिच्याच नवऱ्यासोबत थाटला संसार, आता अभिनेत्रीवर आलीये अत्यंत वाईट वेळ
| Updated on: Mar 12, 2026 | 10:05 AM
Share

Bollywood Actress Divorce: झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी मैत्रिणींच्या नवऱ्यासोबत संसार थाटला आहे… पण काही वर्षांनंतर अभिनेत्रींच्या आयुष्यात देखील मोठं संकट आहे. असंच काही अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्यासोबत देखील झालं आहे. बालकलाकार म्हणून हंसिका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर हंसिका हिने गायक हिनेश रेशमिया याच्या ‘आप का सुरुर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हंसिका हिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही… आता हंसिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

हंसिका हिच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, हंसिका आणि पती सोहेल कथुरिया यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी तीन वर्ष तीन महिन्यांच्या लग्नानंतर एकमेकांना घटस्फोट दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हंसिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

घर तोडणारी महिला हंसिका मोटवानी

हंसिका हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री खास मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच लग्न केलं. ज्यामुळे हंसिका हिच्यावर मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करणारी म्हणून ट्रोल करण्यात आलं. ‘होमब्रेकर’ म्हणून देखील अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं… सोहेल याच्या पहिल्या पत्नीचं नाव रिंकी बजाज असं आहे. रिंकी आणि हंसिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या… सोहेल आणि हंसिका यांच्या लग्नात देखील हंसिका हिने हजेरी लावलेली, त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता हंसिका हिचं देखील सोहेल याच्यासोबत घटस्फोट झाला आहे.

परस्पर संमतीने घटस्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, परस्पर संमतीने घटस्फोट झाला आहे. घटस्फोटात कोणत्याच प्रकारच्या पोटगीची मागणी करण्यात आली नाही… कोणत्याच अटी शिवाय न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मान्य केला आहे. हंसिकाचे वकील, अ‍ॅडव्होकेट अदनान यांनी सांगितल्यानुसार, दोघांनी लग्न केलं होतं, परंतु काही काळानंतर त्यांना लक्षात आले की त्यांच्या वागण्यात आणि जीवनशैलीत लक्षणीय फरक आहेत, ज्यामुळे त्यांच्यात समस्या वाढत गेल्या. परिणामी, त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला आहे.

2024 पासून विभक्त राहत आहेत हंसिका – सोहेल

याचिकेत म्हटल्यानुसार, दोघांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्यांना पटवून देण्याचा आणि त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक प्रयत्न करूनही ते समेट करू शकले नाहीत, ज्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला. हंसिका आणि सोहेल 2 जुलै 2024 पासून वेगळे राहत असल्याचं देखील समोर आलं आहे. हंसिका आणि सोहेल यांनी 4 डिसेंबर 2022 रोजी उद्योगपती सोहेल कथुरियाशी लग्न केलं.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?