कल्याण-डोंबिवली पाणी पुरवठा विस्कळीत, बिघाडच सापडत नसल्याने दिवाळीपूर्वी नागरिकांची पाण्यासाठी वणवण

kalyan dombivali municipal corporation: मागील चार दिवसांपासून दिवस रात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या टीमकडून हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बिघाडच सापडत नसल्याने अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करायची तरी कशी? असे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

कल्याण-डोंबिवली पाणी पुरवठा विस्कळीत, बिघाडच सापडत नसल्याने दिवाळीपूर्वी नागरिकांची पाण्यासाठी वणवण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
| Updated on: Oct 20, 2024 | 11:23 AM
Kalyan-Dombivli Water Cut: कल्याण शहराला पाणी पुरवठा पुरवठा करणाऱ्या उद्चन केंद्रातील मशिनरीमध्ये बिघाड झाल्याने अतिशय कमी दाबाने पाण्याची उचल होत आहे. यामुळे कल्याण शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न अधिकाऱ्याकडून सुरु आहे. मात्र बिघाड सापडत नसल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणी टंचाई उद्भवल्याने नागरिकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ही समस्या पुढील दोन दिवसांत सुटेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बिघाडच सापड नसल्याने अडचण

काही दिवसावर आलेला दिवाळी सण आणि विधानसभा निवडणुकीची आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचे संकट उद्भवल्याने अधिकाऱ्यांची देखील भंबेरी उडाली आहे. दरम्यान उल्हास नदीवरून पाणी उचलणाऱ्या मोहने उद्चन केंद्रातील मशिनरीमध्ये बिघाड झाल्याने पाण्याची उचल संथ गतीने होत आहे. यामुळे शहरात अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मागील चार दिवसांपासून दिवस रात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या टीमकडून हा बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र बिघाडच सापडत नसल्याने अपुऱ्या पाण्याची समस्या दूर करायची तरी कशी? असे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

पाणी कपात होणार नाही

दरम्यान संपूर्ण टीमकडून बिघाड शोधून तो दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर कोणतीही पाणी कपात लादण्याचा महापालिकेचा प्रयत्न नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा नदीत आणि धरणात देखील पुरेसा पाणी साठा असल्याने पाणी कपातीची सध्या तरी आवश्यकता भासणार नाही. मात्र मशिनरीत निर्माण झालेल्या बिघाडामुळे नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास साहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवसांत ही समस्या सुटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नागरिकांनी हा बिघाड त्वरित दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.