Western Railway : पश्चिम रेल्वे अपडेट, मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

Western Railway : मुंबईत लोकल सेवेला जीवनाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबईत लोकलने प्रवास करतात. मुंबईत ठरलेल्या लोकलला काही मिनिटं उशिर झाला तरी सर्व वेळापत्रक बिघडतं. त्यामुळे लोकल वाहतुकीवर मुंबईकर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक आज सकाळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

Western Railway : पश्चिम रेल्वे अपडेट, मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल
Western Railway
| Updated on: Jan 25, 2025 | 8:12 AM

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे किंवा सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे मुंबईत लोकल सेवा विस्कळीत होणं अजिबात नवीन नाही. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेकदा या कारणांमुळे लोकल काही मिनिट उशिराने धावत असतात. मुंबईत लोकल सेवेला जीवनाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबईत लोकलने प्रवास करतात. पश्चिम रेल्वेने देखभालीच्या महत्त्वाच्या कामासाठी 24 तारखेच्या रात्री ब्लॉग घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे 275 लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. हा ब्लॉक रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत आहे.

1888 मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे पूल काँक्रीटच्या खांबांनी बदलला जाणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेने 24 जानेवारी आणि 25 जानेवारीच्या रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत ब्लॉग जाहीर केला आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

पश्चिम रेल्वेने काय सांगितलय

अंधेरी, बोरिवली या पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकात प्रवशांची गर्दी उसळली होती. सहा महत्त्वाच्या स्थाकांवर धीम्या गाड्या थांबत नव्हत्या. चर्चगेचट ते दादर जलद मार्गावर रेल्वे वाहतूक सुरु होती. या मेगा ब्लॉगबद्दल पुरेशी माहिती दिली नाही, असं प्रवाशांच म्हणणं होतं. त्यामुळे प्रवाशी वैतागलेले. सकाळी ऑफिस गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. आता 7.30 नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होईल असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

आज रात्री सुद्धा ब्लॉक

24 जानेवारीप्रमाणे आज रात्री सुद्धा 25 जानेवारीला रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. प्रवाशांची जास्त गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही सुट्टीचेच दिवस निवडल्याच रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी त कर्जत-कसाऱ्यापर्यंत आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते पालघर-डहाणूपर्यंत दररोज लाखो लोक ये-जा करतात. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत या मार्गावर ट्रेन प्रवाशांनी भरलेल्या असतात.