Dada Bhuse : जीआरमध्ये अनिवार्य शब्द कुठे आहे? हिंदीच्या सक्तीवरून दादा भुसे यांचा विरोधकांना सवाल

Hindi Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरीचे धडे गिरवण्याचा सरकारचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावरून सरकारविरोधात टीकेची झोड उठली होती. अखेर काल उशीरा रात्री सरकारने शुद्धीपत्रक काढले. पण आज मंत्री महोदयांनी वेगळीच भूमिका मांडली.

Dada Bhuse : जीआरमध्ये अनिवार्य शब्द कुठे आहे? हिंदीच्या सक्तीवरून दादा भुसे यांचा विरोधकांना सवाल
दादा भुसेंचा सवाल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 18, 2025 | 2:06 PM

राज्यात इयत्ता पहिलीपासूनच भाषिक मावशी हिंदी शिकवण्यासंदर्भात सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. तर अनेक सामाजिक संघटनांनी, जनतेने सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय कुणाला खूष करण्यासाठी घेतला असा सवाल सरकारला विचारण्यात येत होता. त्यानंतर काल रात्री उशीरा सरकारने याविषयी शुद्धीपत्र काढले. आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जरा वेगळीच भूमिका मांडली. त्यांनी हिंदीची सक्ती कुठं केली असा उलट सवाल विरोधकांना केला.

हिंदी अनिवार्य हा शब्द कुठंय?

मंत्री दादा भुसे यांनी, नवीन शासन निर्णय आला त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे असा सवाल विरोधकांना विचारला आहे. पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील त्यांना मराठी बंधनकारक आहे.इयत्ता ५ वी पासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे. काही भाषिक शाळा आहे, त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून असं शिकवलं जातंय, असे भुसे म्हणाले.

हिंदी ही तिसरी भाषाच

पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेला आहे. अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. तिसर्‍या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील त्यांना शिकवलं जाणार आहे, मात्र किमान २० विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्रिभाषा सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून

मराठी शिकवणं सुरू केलं नाही तर अशा शाळांची मान्यता देखील रद्द केली जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय, तेच मी सांगतोय. मराठी ही भाषा होतीच आणि इंग्रजी आणि तिसरी भाषा असे सूत्र होते. इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा स्विकारले आहे. त्यात काय नवीन नाही आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषेचा अवलंबत्व केले आहे.

आपण तिसर्‍या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे. शास्त्र असं बोलतं लहान मुलांची ग्रास्पिंग पावर जास्त असते. लहान मुलांचे शिक्षण घेणं मोठ्या प्रमाणात आहे
लहानपणापासून विद्यार्थ्याला भविष्याचे गुणांकन होणार आहे. विद्यार्थी मेरीटमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण त्रिभाषा सूत्री करतोय. भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल ती भाषा आम्ही देऊ. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचे वाटेल ती तिसरी भाषा देऊ

अनेक लोकांशी संवाद झाले. चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे हा हेतू आहे. मराठी बंधनकारक करतोय, महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे. गर्जा महाराष्ट्र माझा शिकवणार आहे हे का आपण बघत नाहीत, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.