कोण आहेत सर्वाधिक पेन्शन घेणारे माजी आमदार, कोणत्या माजी आमदारांना किती मिळते पेन्शन?

महाराष्ट्रात असे अनेक नेते आहे ज्यांनी अनेक वेळा आमदार होण्याचा मान मिळाला आहे. या सर्व माजी आमदारांना किती पेन्शन मिळते. जाणून घ्या

कोण आहेत सर्वाधिक पेन्शन घेणारे माजी आमदार, कोणत्या माजी आमदारांना किती मिळते पेन्शन?
| Updated on: Dec 23, 2022 | 8:54 PM

मुंबई : आमदार होणं ही अनेकांची इच्छा असते. पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. पण अनेकांना हे माहित नसेल की, एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शन मिळते. दरमहा राज्य सरकारकडून 50 हजारांची पेन्शन (Pension) मिळते. पाच वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन हजारांची वाढ होत जाते.

राज्यातील माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून ही पेन्शन दिली जाते. माजी खासदार किंवा माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आमदार होऊन गेले तरी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून पेन्शन मिळत राहते. सोशल मीडियावर आमदारांच्या पेन्शनची यादी व्हायरल झाली आहे.

पद्मसिंह बाजीराव पाटील यांना 1.10 लाख रुपये पेन्शन मिळते. तर रोहिदास चुडामण पाटील यांना 1.8 लाख रुपये पेन्शन मिळते.  मधुकरराव पिचड यांना 1.10 लाख रुपये पेन्शन मिळते. एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांना 1 लाख रुपये पेन्शन मिळते.

 

ही यादी २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंतची आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.