
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंनी मराठीचा मुद्दा लावून धरला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असा प्रचार त्यांनी केला. मराठीचं कार्ड खेळले. खरंतर या निवडणुकीत ठाकरे बंधुंच अस्तित्व पणाला लागलं होतं. हे दोघांच्या लक्षात आलं, म्हणूनच परस्परांचे विरोधक असूनही ते 20 वर्षानंतर एकत्र आले. मराठी माणूस मुंबईत कसा संकटात आहे हा मुद्दा मराठी माणसाच्या मनावर बिंबवण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले.दोघे एकत्र आल्यामुळे ठाकरे ब्रॅण्ड तरला पण चमकला नाही. चमकला असता, तर मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता आली असती.
मराठी माणसाचा मुद्दा ठराविक प्रमाणात परिणामकारक ठरला. दक्षिण आणि मध्य मुंबईतील आपले गड शाबूत राखण्यात ठाकरे यशस्वी ठरले. थोड्याफार प्रमाणात पश्चिम आणि पूर्व उपनगरात यश मिळालं. परळ, लालबाग, शिवडी, दादर, माहिम, वरळी, दिंडोशी, भांडूप, विक्रोळी आणि वांद्रे पूर्व या मराठी बहुल पट्ट्यात त्यांनी यश मिळवलं. पण कुलाबा, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, बोरिवली, दहीसर या भागात ते भाजपला दणका देऊ शकले नाहीत. एक्सपर्ट्सनुसार, पश्चिम उपनगरात अनेक उच्चभ्र मराठी माणसांनी भाजपची निवड केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली. पण राज ठाकरेंच्या मनसेला ते जमलं नाही. त्यांचा परफॉर्मन्स अपेक्षेनुसार झाला नाही. मनसेला एक आकडी जागांवर समाधान मानावं लागलं. परिणाम युतीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा पल्ला गाठता आला नाही.
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
65 नगरसेवक म्हणजे किती आमदार?
मुंबई पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 163 आणि मनसेने 53 जागा लढवल्या. तेच भाजपने 137 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 90 जागा लढवल्या. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आलेत. 65 नगरसेवक म्हणजे किती आमदार होतात. सहा नगरसेवकांमागे एक आमदार असतो. 65 नगरसेवक म्हणजे 11 आमदार झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्यभरात 20 आमदार निवडून आले. त्यातले 10 आमदार एकट्या मुंबईतून होते. आता त्यांनी जितके आमदार त्याच तुलनेत नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या आहेत.