मुंबईकराचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पाणीकपात वाढणार?, पुढल्या आठवड्यापासून डायरेक्ट… पालिकेचा निर्णय काय ?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ १०% जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट आले आहे. मान्सून लांबण्याचा इशारा मिळाल्याने पालिका सध्याची १०% पाणीकपात पुढील आठवड्यापासून २०% पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी गैरवापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

मुंबईकराचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पाणीकपात वाढणार?, पुढल्या आठवड्यापासून डायरेक्ट... पालिकेचा निर्णय काय ?
मुंबईत पाणीसाठा तळाला, पालिकेचा निर्णय काय ?
| Updated on: Jun 16, 2026 | 9:00 AM

जून महीना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सूनचा काहीच पत्ता नाही. एकीकडे असह्य उकाडा, घामाच्या धारा, चिकचिक, गरमी यामुळे मुंबईकर भयानक वैतागले आहेत. त्यातच आता मुंबईकरांच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता पक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका पुढच्या आठवड्यापासून 20 टक्के पाणी कपात करण्याच्या विचारात आहे.मुंबईत सध्या अनेक ठिकाणी 10 टक्के पाणीकपात सुरू आहे. मात्र पालिका आती पाणीकपात आणखी 10 टक्के वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. लांबलेल्या पावसामुळे मुंबईकरांवरचं पाणीटंचाईचं संकट गदड झालं असून येणाऱ्या काळात पाणीकपात होऊ शकते.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांत फक्त 10 टक्के जलसाठा उरला आहे. लवकरच पाऊस येऊन पुरेसा साठा निर्माण झाला नाही तर मात्र पालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यांना सध्याची 10 टक्के पाणीकपात वाढवून 20 टक्के इतकी करावी लागू शकते.

पालिका करणार कारवाई

दरम्यान पालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पिण्याचं पाणी हे बांधकामासाठी, स्वीमिंग पूलसाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वापरलं तर पालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

7 तलावांनी गाठला तळ, आता फक्त..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांनी तळ गाठला आहे. त्यामध्ये आता फक्त 10 पाणी शिल्लक आहे. ते कमी की काय म्हणन आता मान्सून देखील आणखी लांबणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे पुढील आठवड्यापासू पाणी कपात 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सध्या मुंबईत 10 टक्के पाणी कपरात असली तरी पुढील आठवड्याती ती वाढवली जाऊ शकते.

तलाव भरेपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात वाढवून, पुढील आठवड्यापासून ती 20 टक्क्यांपर्यंत करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचे संभाव्य संकट पाहता पिण्याचे पाणी बांधकामासाठी, स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला.  तसेच पाण्याचा अयोग्य वापर आणि पाणीपुरवठ्याचे आगामी नियोजन यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी शिल्लक जलसाठा किती, ते पाहून पाणीकपात आणखी 10 टक्के वाढवण्याचा पालिकेचा विचार आहे. यामुळे पालिका काय निर्णय घेते याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.

15 जूनपर्यंतचा पाणीसाठा किती ? ( दशलक्ष लीटरमध्ये)

अप्पर वैतरणा – 0

तुळशी – 1,899

तानसा – 8,029

विहार – 11,825

मध्य वैतरण – 21, 674

मोडक सागर – 39, 823

भातसा – 71, 917

एवढा पाणीसाठा आता शिल्लक आहे.

 

Follow Us