पुणे महापालिका आयुक्तांनी थेट स्थायी समितीच्या अध्यक्षांनाच शहर विद्रूपीकरणाचा पुरस्कार केला जाहीर, थेट..

पुणे महापालिकेकडून शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर केली जात आहेत. त्यातच भाजपाच्या सत्ताधारी नगरसेवकाला मोठा दणका महापालिका आयुक्तांकडून देण्यात आला. थेट स्थायी समितीच्या अध्यक्षांनाच हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्या.

पुणे महापालिका आयुक्तांनी थेट स्थायी समितीच्या अध्यक्षांनाच शहर विद्रूपीकरणाचा पुरस्कार केला जाहीर, थेट..
Pune Municipal Corporation
| Updated on: Nov 25, 2026 | 1:13 PM

पुणे तिथे काय उणे याचा प्रत्यक्ष अनुभव बघायला मिळाला. पुणे महापालिकेने भाऊ फ्लेक्स काढा ही मोहीम  सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी फ्लेस लावून शहराचे विद्रूपीकरण करत आहेत, त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आता सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाला मोठा दणका महापालिका आयुक्तांकडून देण्यात आला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सत्ताधारी नगरसेवकांनी ज्याचा विचार केला नाही तेच केले. पुणे महापालिकेत आज भाजपाची सत्ता आहे. महापालिकेने सुरू केली मोहीम शहरात अनधिकृत फ्लेक्स ज्यांचे आढळतील त्यांना शहर विद्रूपीकरण पुरस्कार दिला जाणार आहे. त्यात भाजपाचेच नगरसेवक आढळून आले. पहिल्या नंबरचा पुरस्कार भाजपालाच मिळाला आहे. फक्त नगरसेवकच नाही तर थेट स्थायी समितीच्या अध्यक्षाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. शहरातील विकास कामांना मान्यता स्थायी समितीकडूनच दिली जाते. शहराच्या विकासाची जबाबदारी स्थायी समितीची असते, त्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही, त्यातच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणजे महापालिकेतील मोठ्या पदांपैकी एक आहे. शहराची जबाबदारी त्यांच्यावर असते.

Loading...

पण पुण्यात स्थायी समितीच्या अध्यक्षांकडूनच शहर विद्रूपीकरण केले जात आहे. सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स शहरात त्यांचेच दिसून आली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पृथ्वीराज सुतार तर तिसरा क्रमांक हा सुनील पांडे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. भाऊ फ्लेक्स काढा ही मोहीम महापालिकेने सुरू केली. त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही.

आज श्रीनाथ भीमले यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने शहरात बॅनर झळकले आहेत. आयुक्तांनी वाढदिवसाच्या दिवशीच अनोख गिफ्ट हे भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांना दिले. थेट पुरस्काराच्या नावाची घोषणाच त्यांच्याकडून करण्यात आली. पुणे महापालिका प्रशासनाकडून शहर विद्रूपीकरण टाळण्यासाठी मोठी पाऊले उचलली जात आहेत. त्यातच आता पुरस्काराची घोषणा ही करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us